Post Office ची विना झंझट स्कीम,चक्क 25 लाख रुपयांची बेगमी

शेअर बाजारातील चढ आणि उताराची स्थिती सुरु आहे. ज्यामुळे तुम्हाला चांगले व्याज हवे तर तुमच्यासाठी पोस्टाची स्मॉल सेव्हींग स्कीम्स चांगला पर्याय ठरतील. यात पैसे बुडण्याचा जराही धोका नसतो. शिवाय यात तगडे व्याज मिळते. पोस्टाची ही योजना भारी, थेट 25 लाखांचा फंड !

| Updated on: Oct 12, 2026 | 11:30 AM
1 / 6
 Zero Risk असते पोस्ट ऑफिसची स्कीम- जर तुम्ही कोणत्याही रिस्क शिवाय गुंतवणूक करु इच्छीता तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस स्कीम (Post Office Schemes)चांगली आहे. या सरकारी स्कीममध्ये गुंतवणूक छोट्या रकमेने केली तरी चांगले रिटर्न मिळतात. शिवाय सरकारची गॅरंटी असते. त्यामुळे या योजनांना झिरो रिस्क योजना म्हणतात. पोस्टाची आरडी स्कीम यापैकी एक आहे.

Zero Risk असते पोस्ट ऑफिसची स्कीम- जर तुम्ही कोणत्याही रिस्क शिवाय गुंतवणूक करु इच्छीता तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस स्कीम (Post Office Schemes)चांगली आहे. या सरकारी स्कीममध्ये गुंतवणूक छोट्या रकमेने केली तरी चांगले रिटर्न मिळतात. शिवाय सरकारची गॅरंटी असते. त्यामुळे या योजनांना झिरो रिस्क योजना म्हणतात. पोस्टाची आरडी स्कीम यापैकी एक आहे.

2 / 6

केवळ 100 रुपयांनी सुरुवात करता येते - पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉजिट स्कीममध्ये पैसे बुडण्याचा(PO RD Scheme) धोका नसतो. गुंतवणूकदारांना 6.7% पर्यंत घसघशीत व्याज मिळते. केवळ 100 रुपयांच्या गुंतवणूकीतून अकाऊंट ओपन करता येते. या योजनेत कमाल गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नसते. (Photo: GettyImage)

3 / 6

मोठा निधी जमा करण्यासाठी पोस्ट ऑफीस रिकरिंगच्या डिपॉझिटची स्कीम कार्यक्षम आहे, त्यात अनेक सुविधा मिळतात. Post Office RD Scheme च्या मध्ये अनेक बेनेफिट्स पाहायला मिळतात. यात गुंतवणूकीसाठी मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे. मात्र, यात मॅच्युरिटी पिरियड आधीही गुंतवणूकदार अकाऊंट क्लोज करु शकतात.तसेच पुढील पाच वर्षांसाठी देखील योजना वाढवता येत. कोणत्याही जवळच्या post Office मध्ये जाऊन खाते खोलू शकता. (Photo: ITG)

4 / 6

पोस्ट ऑफिस RD त लोन सुविधा - पोस्ट ऑफीसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूकीवर लोनची सुविधा देखील मिळते. मात्र, यासाठीची नियम निश्चित केले आहेत. PO RD Scheme मध्ये गुंतवणूकीला एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याज गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा झाल्यानंतर तुम्ही लोनसाठी अर्ज करु शकता. पन्नास टक्के रक्कम लोनच्या रुपात काढता येते आणि यावर व्याज केवळ 2 टक्के दराने द्यावे लागते.

5 / 6

असे जमवा 25 लाख रुपये - पोस्ट ऑफिस द्वारा संचालित या सरकारी स्कीम (Govt Scheme)मध्ये नियमित गुंतवणूकीद्वारे 25 लाख रुपये जमा करु शकता. यात मोठा फंड जमा करण्यासाठी कॅलक्युलेशन खूप सोपे आहे.

6 / 6

Post Office RD Calculator गणती केली तर तुम्हाला 15,000 रुपये मासिक जमा करावे लागतील. मॅच्युरिटीपर्यंत म्हणजे 5 वर्षांत तुमचा एकूण फंड 10,70,492 रुपये होईल आणि यात केवळ व्याजाची कमाई 1,70,492 रुपयांपर्यंत होईल. जर तुम्हाला मासिक गुंतवणूक पाच वर्षांपर्यंत वाढवायची असेल. असेच दहावर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास तुमचा एकूण फंड वाढून 25,62,822 रुपये होईल आणि व्याजातूनच 7,52,822 रुपयांची कमाई होईल. (Photo: GettyImage)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us