
चाणक्य नीतिमध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर आपण चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर अनेक समस्या दूर होतील.

कुटुंबाच्या प्रमुखामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. कुटुंबियांचा विचार करून त्याने निर्णय घ्यावीत.

चाणक्य नीतिनुसार कुटुंब प्रमुखाने कायमच आपल्या निर्णयावर ठाम असावे. कोणाच्याही सांगण्यावरून त्याने आपले निर्णय बदलू नयेत.

कुटुबाच्या प्रमुखाने घरातील सदस्यांमध्ये अजिबातच भेदभाव करू नये. त्याच्यासाठी घरातील सर्वच सदस्य एकसारखी असावीत.

चाणक्य नीतिनुसार कुटुंब प्रमुखाने खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. नेहमीच कुटुंबातील प्रमुखाने घरातील वयस्कर लोकांना सन्मान करायला हवा.