
बऱ्याचदा असे होते की, रात्रभर व्यवस्थित झोप झाल्यानंतरही सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश अजिबातच वाटत नाही. शिवाय भयंकर थकवा जाणवतो. काहीही करण्याची इच्छा होत नाही.

अशावेळी बरेच लोक झोपी जातात. मात्र, हे करण्याऐवजी थोडे उठून आपण शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण झोपी गेल्याने आपला अशक्तपणा अधिक वाढू शकतो.

अशावेळी आपण ओट्स खाऊ शकता. ओट्स थकवा दूर करण्यास मदत करते. कारण त्यामध्ये जटिल कर्बोदके असतात, जी हळूहळू ऊर्जा सोडतात आणि शरीराला जास्त काळ सक्रिय ठेवतात.

ओट्समध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते. ओट्स खाल्ल्याने अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

ओट्समध्ये लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी असते, जे स्नायू आणि मज्जासंस्थेला बळकट करतात, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा कमी होतो. हे अत्यंत फायदेशीर आहे.