रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे ‘हे’ तीन काम करा, हिवाळ्यातही चमकेल तुमचा चेहरा
हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे चेहरा कोरडा पडू शकतो आणि त्याची चमक कमी होऊ शकते. यासाठी त्वचा कोरडी पडू नये म्हणून फक्त स्मार्ट स्किनकेअरवर लक्ष केंद्रित करा. आजच्या लेखात हिवाळ्यातही तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी कोणत्या तीन गोष्टी कराव्यात हे जाणून घेऊयात.

थंडीच्या या ऋतूमध्ये थंड आणि कोरडी हवा त्वचा कोरडी आणि निर्जीव बनवते. आपल्यापैकी अनेकांचे या ऋतूत हात, पाय आणि चेहऱ्यावरील त्वचा कोरडे समस्या जास्त असते कारण हे भाग थंड हवा आणि थंड पाण्याच्या संपर्कात जास्त असतात. अनेक लोकांना ओठांची त्वचा कोरडी पडते, म्हणून या ऋतूमध्ये विशेष त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. तथापि प्रत्येकाकडे स्किन प्रोडक्ट त्वचेवर लावण्यासाठी किंवा घरगुती उपाय करून वापरून पाहण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. अशा वेळेस स्मार्ट त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यातही तुमची त्वचा निरोगी आणि मऊ राहण्यासाठी तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या तीन गोष्टी कराव्यात ते जाणून घेऊयात.
हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि चेहरा धुण्यासाठी किंवा आंघोळीसाठी जास्त गरम पाणी वापरणे टाळणे महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त तुम्ही या ऋतूत अक्रोड आणि बदाम सारखे काही नट्स भिजवून सकाळी खा. यातून चांगले फॅट्स आणि व्हिटॅमिन ई मिळते, जे आतून निरोगी त्वचा राखण्यास मदत करते. आता तुमच्या हिवाळ्यातील रात्रीच्या वेळी स्किन केअर करण्याच्या दिनचर्येबद्दल जाणून घेऊया.
डबल क्लींजिंग आवश्य करा
संध्याकाळी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत डबल क्लींजिंगचा समावेश करा. एक सोपी पद्धत म्हणजे तुमचा चेहरा धुवा आणि नंतर कच्च्या दुधात भिजवलेल्या कापसाच्या मदतीने तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे मॉइश्चरायझिंग टच देखील मिळेल. दुधात लैक्टोज असते, जे तुमच्या त्वचेला आराम देते. संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी देखील हे फायदेशीर आहे.
या गोष्टींनी करा स्किन टोन
दररोज तुमच्या त्वचेला टोन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात यासाठी गुलाबपाणी आणि ग्रीन टी सर्वोत्तम आहे. ग्रीन टी उकळवा आणि गाळा, त्यात समान प्रमाणात गुलाबपाणी मिक्स करा आणि ते स्प्रे बाटलीत भरा. रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ केल्यानंतर ते स्प्रे करा. यामुळे तुमची त्वचा ताजी आणि चमकदार राहील, तसेच प्रदूषण, सूर्य आणि धूळ यामुळे होणारा निस्तेजपणाही कमी होईल.
बदाम तेल लावा
हिवाळ्यात, क्लींजिंग आणि टोनिंग व्यतिरिक्त मॉइश्चरायझिंग करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी बदाम तेल वापरणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. बदाम तेल व्हिटॅमिन ई चा समृद्ध स्रोत आहे आणि त्यात चांगले फॅट्स असतात जे त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि पोषण देतात. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि तेजस्वी होईल. बदाम तेल तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार हालचालींमध्ये मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
