AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये खळबळ! बड्या नेत्याचा आधी राजीनामा अन् नंतर… पडद्यामागे मोठ्या घडामोडी

Congress : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी राजीनामा दिला होता, मात्र अवघ्या काही तासांनंतर त्यांनी यू-टर्न घेत राजीनामा मागे घेतला असल्याचे समोर आले.

काँग्रेसमध्ये खळबळ! बड्या नेत्याचा आधी राजीनामा अन् नंतर... पडद्यामागे मोठ्या घडामोडी
Bhupen BorahImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 16, 2026 | 6:45 PM
Share

गेल्या काही काळापासून देशातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अशातच आज आसाम काँग्रेसमध्ये नाट्यमय प्रसंग घडल्याचे समोर आले आहे. आसाम काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी राजीनामा दिला होता, मात्र अवघ्या काही तासांनंतर त्यांनी यू-टर्न घेत राजीनामा मागे घेतला असल्याचे समोर आले. या सर्व घडामोडींदरम्यान काँग्रेसचे आसाम प्रभारी जितेंद्र सिंग यांनी आणि प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर बोरा यांनी आपला निर्णय मागे घेतला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भूपेन बोरा यांची भेट घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांनी म्हटले की, बोरा यांनी काँग्रेस हायकमांडकडे निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. राहुल गांधी हे बोरा यांच्याशी बोलले आहे, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. पुढे बोलताना गोगोई म्हणाले की, ‘जर पक्षातील काही मुद्द्यांमुळे भूपेन बोरा दुखावले असतील तर आम्ही त्यांची माफी मागितली आहे.’

भूपेन बोरा काय म्हणाले?

राजीनाम्याबाबत बोलताना भूपेन बोरा म्हणाले की, ‘मी आत्ताच राजीनामा का दिला यावर चर्चा करणे मला योग्य वाटत नाही. मी तो हायकमांडला पाठवला आहे. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुम्हा सर्वांना बोलवून याबाबत सविस्तर माहिती देईल.’ पक्षातील नाराजीबाबत बोलताना बोरा म्हणाले की, ‘मी राजीनामा का दिला याबद्दल काही लोकांना कल्पना आहे. मी पीसीसी प्रमुखांना सांगितले की जर काँग्रेस पक्ष माजुली यात्रेत कोण सहभागी होईल हे ठरवू शकत नसेल, तर मला वाटते की मी भविष्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला हवा.’

भूपेन बोरा यांना भाजपकडून ऑफर?

भूपेन बोरा यांना भाजपकडून ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी भूपेन बोरा यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत असं म्हटलं होते. सरमा म्हणाले की, ‘जर बोरा भाजपमध्ये सामील झाले तर ते त्यांना सुरक्षित जागेवरून निवडणूक जिंकण्यास मदत केली जाईल.’ त्यामुळे आता बोरा काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा