AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 दिवसाआधी बोलून दाखवलेली ती भीती अखेर खरी ठरली, अजितदादांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले दोन दिवसांनी…

अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते, त्या विमानाचा ब्लॅकबॉक्स जळालेला आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांच्या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.

5 दिवसाआधी बोलून दाखवलेली ती भीती अखेर खरी ठरली, अजितदादांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले दोन दिवसांनी...
ajit pawar plane crash and rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 16, 2026 | 6:24 PM
Share

Rohit Pawar : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूबाबत आता अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे केले होते. दरम्यान, आता अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होतो, त्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स जळालेल्या स्थितीत असल्याचे सांगिले जात आहे. या ब्लॅकबॉक्समधील माहिती संकलनासाठी तो परदेशात पाठवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती समोर येताच आमदार रोहित पवार यांनी हादरवून टाकणारं भाष्य केलं आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट करून अजितदादांसोबत घातपात झाल्याच्या संशयाला बळ मिळाले असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. सोबतच त्यांनी दोन दिवसांत आणखी एक पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

रोहित पवार यांनी नेमका काय दावा केला?

अजितदादांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली पण अजून तपास यंत्रणांना मात्र समजलेली दिसत नाही. दुर्दैवी अपघातानंतर २० दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही, असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला. तसेच केवळ VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे त्यावरून मी ५ दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. दोन दिवसात पुन्हा पत्रकार परिषदेत भेटू असे सांगून त्यांनी आणखी काही धक्कादायक खुलासे करणार असल्याचे सूतोवाच केले आहे.

रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत काय मागणी केली होती?

दरम्यान. अजितदादांचा अपघात नव्हे तर नियोजित अपघात आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. तसेच अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, परदेशी तपास संस्थांकडे या घटनेचा तपास द्यावा, असी मागणीही रोहित पवार यांनी केली होती.

Follow Us
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न