Health Tips: डाळिंब खाल्ल्याने खरंच रक्त वाढतं ? डायटिशियनचं म्हणणे काय?

डाळिंबाच्या चवीमुळे अनेकांना ते आवडते. मात्र, डाळिंबाचा आणि रक्तवाढीचा खरंच संबंध आहे का ? कोणी हे फळ खावे तर कोणी टाळावे याची माहिती डॉक्टरांकडून घेऊयात...

| Updated on: Nov 18, 2026 | 8:22 PM
1 / 6
रक्तवाढीसाठी अनेकदा डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जात असतो. त्यामुळे तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की डाळिंब खाल्ल्याने खरंच रक्त वाढते का ? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. यात पोटेशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.

रक्तवाढीसाठी अनेकदा डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जात असतो. त्यामुळे तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की डाळिंब खाल्ल्याने खरंच रक्त वाढते का ? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. यात पोटेशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.

2 / 6

जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर डाळिंब जरुर खावीत. तसेच शुगरचे रुग्ण देखील थोड्या प्रमाणात डाळिंब खाऊ शकतात. मात्र, ज्युस न खाता डाळिंब अख्खं चावून खाणे चांगले असते. .

3 / 6

लाल रंग असल्याने अनेकांना वाटते की डाळिंबाने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. परंतू असे अजिबात नाही. यात फायबर, पोटेशियम असल्याने हे फळ सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते असे डायटिशियन डॉ. ज्योती सिंह यांनी सांगितले आहे.

4 / 6

जर तुम्हाला डायबिटीज असेल तर हे फळ खावे की नाही असा प्रश्न पडत असेल तर डाळिंब हे जरी गोड असले तरी तुम्ही डॉक्टरांना विचारुन त्याचे सेवन करु शकता.

5 / 6

ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी डाळिंबाचे सेवन करणे चांगले असते. डाळिंबाचा ज्युस कधी घेऊ नये, तर ते थेट साली सोलून खावे. त्यामुळे फायबर पोटात जाते आणि शौचाला चांगले येऊन पोट स्वच्छ होते असे डॉ.ज्योती सिंह यांनी सांगितले.

6 / 6

डाळींबाचा ज्युस प्यायल्याने शुगर वाढू शकते, त्यामुळे ते कच्चे चावून खावे. जास्त डाळिंब खाल्ले तर किडनीचे रुग्ण आहेत,त्यांना त्रास होऊ शकतो. कोणतेही फळ खाताने ते ज्यूस करण्यापेक्षा ते अख्खे खाण्यावर भर द्यावा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us