
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

सध्या नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

नुकतंच हीनानं मालदीव सफर केली, आता ती या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.

या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. हीनाचा हा परफेक्ट समर लूक तुम्हीही तुमच्या व्हेकेशनला ट्राय करू शकता.