
श्वेता तिवारी आपल्या फिटनेससाठी प्रॉपर डाएट फॉलो करते. ती फक्त टीव्हीच नाही, तर चित्रपटांमध्ये सुद्धा काम करते.

श्वेता तिवारीची मुलगी पलक 24 वर्षांची आहे. पण श्वेता फिटनेसमध्ये मुलीच्या दोन पावलं पुढे आहे. पण तुम्हाला माहित आहे का? श्वेता दररोज कुठल्या जनावराच मांस खाते?

हो, अभिनेत्री श्वेता तिवारी रोज मांसाहार करते, ती नॉन व्हेज खाते. आपला फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी दिवसात एकदा अभिनेत्री सॉलिड मील खाते.

श्वेता तिवारीच्या ट्रेनरने सांगितलं की, ती दररोज ग्रिल्ड चिकन किंवा फिश खाते. तिच्या आहारात प्रोटीन रिच डिनर असतो.

श्वेता तिवारीला खिचडी सुद्धा भरपूर आवडते. सोबत ज्वारीची भाकरी, हिरव्या पालेभाज्या, जे हेल्डी फूड आहे ते ती खाते.