
सध्या देशभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तरुण, मुलं-मुली जोमात पतंगबाजी करताना दिसत आहेत. मकर संक्रांतीत पतंग उडवले जातात.

दरम्यान मकर संक्रांतीला देशभरात पतंग उडवले जातात. परंतु भारतात पतंग नेमका कसा आला? याबाबत फारच कमी लोकांना कल्पना आहे. त्यामुळे पतंगाचा इतिहास जाऊन घेऊ या...

खरं म्हणजे पतंगाचा शोध हा भारतात लागलेला नाही. भारताचा शेजारी देश चीनने पतंगाचा शोध लावलेला आहे. साधारण 2000 वर्षांपूर्वी पतंगाचा शोध लागल्याचे बोलले जाते.

चीनचा तत्त्वज्ञ हुआंग थेग याने पहिल्यांदा पतंग तयार केला होता, असे सांगितले जाते. शानडोंग क्षेत्रातच पतंगाचा शोध लागला. सुरुवातीला पतंग आयाताकृती होता. त्यानंतर कालांतराने पतंगाचा आकार बदलत गेला.

तेराव्या शतकात चीननंतर पतंग कोरियत आला. त्यानंतर हळूहळू भारतातही पतंग उडवण्यास सुरुवात झाली. चीनी यात्री फा हेन आणि ह्यून सांग या दोन्ही प्रवाशांनी भारतात पतंग आणल्याचे बोलले जाते.