“सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा?” अजित पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले एकनाथ खडसे?
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चात पार्टी फंडसाठी 110 कोटी रुपये वाढवण्यात आल्याच्या अजित पवारांच्या आरोपांवरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. खडसे यांनी स्पष्ट केले की, 1999 मध्ये मी जलसंपदा मंत्री असताना असा कोणताही निर्णय झाला नव्हता.

अजित पवारांनी हे आरोप करत म्हटले होते की, अधिकाऱ्यांनी सांगितले की पार्टी फंडसाठी 100 कोटी रुपये वाढवण्यात आले आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी 10 कोटी वाढवले, असे एकूण 110 कोटी वाढवण्यात आले. यावर खडसे यांनी अजित पवारांना प्रतिप्रश्न केला आहे की, जर ही माहिती खरी होती, तर त्यांनी 25 वर्षे ती का दडवून ठेवली? 25 वर्षे अजित पवार भ्रष्टाचाराला संरक्षण देत होते का, असा थेट सवाल खडसेंनी विचारला.
तर खडसेंनी असेही म्हटले आहे की, पार्टी फंडसाठी एस्टिमेट वाढवणे किंवा टेंडरमध्ये अधिक दर देणे हे शक्य नाही. जनतेच्या माहितीसाठी अजित पवारांनी त्यांच्याकडे असलेली फाईल खुली करून सत्यता तपासून घ्यावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का