AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : विराटचा सलग दुसऱ्या सामन्यात झंझावात, सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक, कोहलीचा नववर्षात धमाका सुरुच

Virat Kohli Broke Sachin Tendulkar Record IND vs NZ 2nd Odi : विराट कोहली याने राजकोटमध्ये 23 धावांच्या खेळीसह सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक केला. विराटने सचिनच्या तुलनेत 7 सामन्यांआधी हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराटची सचिनचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेतील ही सलग दुसरी वेळ ठरली.

IND vs NZ : विराटचा सलग दुसऱ्या सामन्यात झंझावात, सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक, कोहलीचा नववर्षात धमाका सुरुच
Team India Virat Kohli RajkotImage Credit source: Bcci
sanjay patil
sanjay patil | Updated on: Jan 14, 2026 | 7:21 PM
Share

भारताचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने 2026 वर्षातील सलग दुसऱ्या सामन्यात यशस्वीरित्या धमाका सुरु ठेवलाय. विराटने न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार खेळी केली. विराटने रविवारी 11 जानेवारीला 93 धावांची खेळी केली. विराटचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. मात्र विराटने या खेळीत 2 खास कारनामे केले. विराटची ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याची सलग पाचवी वेळ ठरली. तसेच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 28 हजार धावा करत सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा या दोघांना मागे टाकलं. विराटने आता त्यानंतर बुधवारी 14 जानेवारीला राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये सचिनचा आणखी एक विक्रम मोडीत काढला आहे.

सचिन तेंडुलकर याचा मोठा विक्रम मोडीत

विराट पहिल्या वनडेत 93 धावांवर बाद झाला. विराटने यासह भारताकडून न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनच्या सर्वाधिक धावांची बरोबरी केली होती. त्यामुळे विराटला दुसऱ्या सामन्यात सचिनला मागे टाकण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज होती. विराटने राजकोटमध्ये आपल्या खेळीतील पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत सचिनचा महाविक्रम आपल्या नावावर केला. विराटने यासह सचिनच्या नावावर असलेला सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. विराट यासह न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंग याच्या नावावर आहे.

विराटला राजकोटमधील या सामन्यात अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र विराट त्या खेळीला अर्धशतकात बदलण्यात अपयशी ठरला. विराटने 29 बॉलमध्ये 23 रन्स केल्या. विराटने या खेळीत 2 चौकार लगावले.

न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावा

रिकी पाँटिंग, 51 सामने :1 हजार 791 धावा

विराट कोहली, 35 सामने : 1 हजार 773 धावा

सचिन तेंडुलकर, 42 सामने : 1 हजार 750 धावा

सनथ जयसूर्या, 47 सामने : 1 हजार 519 धावा

विराट कोहली याची आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप

दरम्यान विराट 14 जानेवारीला धमाका केला. विराटने रोहित शर्मा याला मागे टाकत आयसीसी वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. विराटने यासह पावणे 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली. विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2021 नंतर पहिल्यांदा आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान.
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?.
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम.
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल.
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का.
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात.
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका.
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर.
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?.