AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : कुटुंबात सतत भांडणं होतायेत? एक मिनीट पण मनाला शांतता नाहीये? मग आजच करा हे सोपे उपाय

अनेकदा असं होतं की घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात. त्यासाठी वास्तुदोष हे देखील एक कारण असू शकतं. आज आपण घरातील वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे आणि सहज करता येण्यासारखे उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : कुटुंबात सतत भांडणं होतायेत? एक मिनीट पण मनाला शांतता नाहीये? मग आजच करा हे सोपे उपाय
vastu shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 6:42 PM
Share

अनेकदा असं होतं की घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं सुरू असतात. पती-पत्नीचं एकही मिनिट पटत नाही. कुटुंब प्रमुखाचे कोणत्या नं कोणत्या कारणामुळे सतत घरातील सदस्यांसोबत वाद होतात. घरात शांती टिकत नाही, यासाठी अनेक कारणं असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील अशी परिस्थिती निर्माण होते. जर घर अशांत असेल, पती-पत्नीचं पटत नसेल तर त्याचा परिणाम हा त्या घरातील लहान मुलांच्या मनावर देखील होतो. ते देखील चिडचिड करतात. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक असतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जेवढ्या काही वस्तू असतात, त्या प्रत्येक वस्तूंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकरात्मक असा परिणाम होत असतो. तसेच वास्तुशास्त्रामध्ये दिशेला देखील खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू ही योग्य दिशेलाच ठेवली गेली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले उपाय.

देवघर – वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं. तसेच त्याची रचना ही तुम्ही जेव्हा पुजेसाठी बसता तेव्हा तुमचं तोंड हे पूर्वेला किंवा पश्चिमेला होईल अशी हवी. तसेच देवघराची नियमित स्वच्छता करावी, दररोज आठवणीने देवघरात दिवा लावावा. यामुळे वास्तुदोष दूर होतो, नकारात्मक शक्ती नष्ट होते, सकारात्मक शक्तींमुळे घरातील वाद विवाद टळतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

पूर्वजांचे फोटो – आपल्या पूर्वजांचे फोटो कधीही देवघरात ठेवण्याची चूक करू नका, कारण तुमच्या घरातील देवघर हे सकारात्मक शक्तींचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. अशा स्थितीमध्ये तुम्ही जर तुमच्या पूर्वजांचे फोटो देवघरात जर ठेवले तर त्याचा तुमच्या आयुष्यावर भयंकर नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे कधीही आपल्या पूर्वजांचे फोटो हे देवघरात ठेवू नये, तर ते नेहमी आपल्या घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीला लावावेत. जर तुम्ही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवले तर त्यामुळे घरात भांडणं होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

काळा रंग – घराची सजावट करताना कधीही काळ्या रंगाचा वापर करू नका, कारण काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतिक माण्यात येतो. त्यामुळे घरात कधीही सजावटीसाठी काळ्या रंगाचा वापर करू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

रंग संगती – घराची सजावट करताना नेहमी हलक्या व सौम्य कलरचा वापर करावा, जसं की पांढरा, सौम्य निळा, हिरवा असे रंग वापरावेत, भडक रंगांचा वापर करू नये. या उपायामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त