ATM मध्ये एका वेळेला किती लाख रुपये असतात; आकडा वाचून चकितच व्हाल!

एटीएममध्ये किती रुपये जमा करता येतात, याची अनेकांना माहितीच नसते. एटीएममध्ये एका वेळी किती रक्कम जमा करता येते, याचा आकडा वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

| Updated on: Dec 21, 2025 | 9:13 PM
1 / 5
रोख रकमेची गरज असली की बँकेत जाण्याऐवजी आपण अगोदर एटीएममध्ये जातो. ATM  ही अशी मशीन असते ज्यात आपण ATM कार्ड टाकताच कॅश पैसे मिळतात. पण अनेकदा एखाद्या ATM  मध्ये पैसेच नसतात. त्यामुळे आपली चांगलीच पंचाईत होते. दरम्यान, एका ATM  मध्ये बँक किती रुपये टाकू शकते, त्यासाठीचा नियम का आहे हे जाणून घेऊ या...

2 / 5
 एटीएम बाहेरून खूप साधे आणि सरळ वाटते. आपण एटीएम कार्ड आणि पीन कोड टाकला की लगेच आपल्याला कॅश नोटा मिळतात. पण ATM  चालवण्यासाठी एक विशेष यंत्रणा काम करत असते. तुम्ही जेवढा आकडा दाबला तेवढेच पैसे तुम्हाला मिळतात.

3 / 5
ATM  मशीनमधील पैसे संपले की त्यात पुन्हा एकदा बँकेचे कर्मचारी पैसे टाकतात. ATM  मध्ये एक कॅश बॉक्स असतो. या कॅश बॉक्समध्ये नोटा टाकल्या जातात. एका वेळी ATM  मशीनमध्ये साधारण आठ ते दहा हजार नोटा टाकता येतात.

4 / 5
म्हणजेच एटीएममध्ये टाकलेल्या सर्वच नोटा जर 500 रुपयांच्या आहेत, असे गृहित धरले तर एका वेळी ATM  मध्ये 40 ते 50 लाख रुपये टाकता येतात. परंतु एटीएमचे ठिकाण, त्या ATM  चा होत असलेला वापर यावरून संबंधित ATM  मध्ये किती रुपये टाकायचे याचा निर्णय बँक घेते.

5 / 5
त्यानुसारच काही ATM मध्ये कमी पैसे टाकले जातात. तर काही मशीन्समध्ये टाकलेली रक्कम जास्त असते. दुसरी बाब म्हणजे ATM  मध्ये फक्त 500 रुपयांचीच नोट नसते. ATM मध्ये 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा असतात. म्हणजेच एका ATM  मशीनमध्ये साधारण 20 ते 30 लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम असू शकते.