MTHL | शिवडी-न्हावा शेवा पुलावरुन दररोज किती हजार वाहन जाणार? किती कोटी लिटर पेट्रोल-डिझेलची बचत होणार?

| Updated on: Jan 12, 2024 | 11:48 AM

Mumbai Trans Harbour Link | मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक म्हणजे शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलामुळे पर्यावरणाचा फायदा होणार आहे. या सागरी ब्रिजमुळे फक्त वाहतूक कोंडीच कमी होणार नाहीय, तर प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी सुद्धा कमी होतील.

1 / 5
शिवडी-न्हावा शेवा पूल म्हणजेच अटल सेतूच आज उद्गाटन होणार आहे. अवघ्या सात वर्षात बांधून तयार झालेला हा पूल उत्कृष्ट सिव्हिल इंजिनिअरींगचा नमुना आहे.

2 / 5
मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक हा एकूण 21.8 किलोमीटर लांबीचा पूल आहे. या ब्रिजचा 16.50 किमीचा मार्ग समुद्रात आणि 5.5 किमीचा मार्ग जमिनीवर आहे. अटल सेतू हा 6 पदरी सागरी ब्रिज आहे.

3 / 5
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या ब्रिजवरुन प्रवास करुन अनुभव घेणार आहेत. या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे 2 तासाच अंतर अवघ्या 20 मिनिटावर येणार आहे.

4 / 5
शिवडी-न्हावा शेवा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर त्यावरुन दररोज 70 हजार वाहनांचा प्रवास सुरु होईल असा हा पूल बांधणाऱ्या MMRDA चा अंदाज आहे.

5 / 5
शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलामुळे वर्षाला 1 कोटी लिटर इंधनाची बचत होणार आहे. त्याशिवाय CO2 इमिशन म्हणजे कार्बन उत्सर्जन 25 हजार मिलियन टनने कमी होणार आहे. हा एक प्रकारे पर्यावरणाचा फायदाच आहे.