Jaggery In Winter: थंडीच्या दिवसात ‘अशा’ पद्धतीने खा गूळ! मिळतील अगणित फायदे

हिवाळ्यात गूळ खालेला चांगला. पण नेमक्या कोणत्या पद्धतीने गूळ खाल्ल्याने फायदा जास्त होईल याबद्दल जाणून घ्या.

| Updated on: Nov 29, 2026 | 3:53 PM
1 / 6
हिवाळ्याच्या दिवसांत अनेक लोक गूळ खाणे पसंत करतात. काही लोक जेवणानंतर गूळ खातात, तर काही जण साखरेपासून बनवलेल्या गोड पदार्थांऐवजी गुळाचा वापर करतात. पण केवळ  खाण्याव्यतिरिक्त, गुळाचा समावेश आहारात करण्याच्या अनेक पद्धती आहेत.

हिवाळ्याच्या दिवसांत अनेक लोक गूळ खाणे पसंत करतात. काही लोक जेवणानंतर गूळ खातात, तर काही जण साखरेपासून बनवलेल्या गोड पदार्थांऐवजी गुळाचा वापर करतात. पण केवळ खाण्याव्यतिरिक्त, गुळाचा समावेश आहारात करण्याच्या अनेक पद्धती आहेत.

2 / 6

जर तुम्हीही हिवाळ्यात गूळ खात असाल, तर तुम्ही तो इतर खाद्यपदार्थांसोबत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. आहारतज्ज्ञ अवनी कौल यांनी गूळ खाण्याचे काही सोपे उपाय सुचवले आहेत.

3 / 6

दुधासोबत गूळ खाणे फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही एका ग्लास किंवा कप दुधात थोड्या प्रमाणात गूळ मिसळू शकता. याचा समावेश तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात करू शकता; हे मिश्रण चवीला चांगले लागते आणि तयार करायलाही खूप कमी वेळ लागतो.

4 / 6

हलवा बनवताना साखरेऐवजी गुळाचा वापर करता येतो. गुळामुळे हलव्याला थोडी वेगळी चव मिळते आणि गोडवाही सौम्य असतो. उदाहरणार्थ, बटाट्याचा हलवा गुळ वापरून तयार करता येतो.

5 / 6

गूळ कोमट पाण्यात मिसळूनही त्याचे सेवन करता येते. यासाठी, कोमट पाण्यात थोडासा गूळ घालून तो नीट ढवळून घ्यावा. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केले जाऊ शकते. गुळाचे कोमट पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकते.

6 / 6

याशिवाय तुम्ही गूळ दूध, डाळ, हलवा, कोमट पाणी किंवा तीळासोबत घेऊ शकता. यामुळे दैनंदिन आहारात गुळाचा समावेश करणे सोपे होते.याशिवाय याचे फायदेही दुप्पट होतात. एकसाथ दोन गोष्टींचे फायदे मिळतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us