ट्रायल रुममध्ये असतो छुपा कॅमेरा, होऊ शकतो MMS व्हायरल, चुक करू नका अन्यथा…

कपडे खरेदी करताना आपण ते अगोदर ट्रायल रुममध्ये परिधान करून पाहतो. परंतु ट्रायल रुममध्ये छुपे कॅमेरे असण्याची शक्यता असते. म्हणूनच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Prajwal Dhage | Updated on: Jan 14, 2026 | 6:06 PM
1 / 5
आपण कपडे खरेदी करण्यासाठी अनेकदा एखाद्या मोट्या दुकानात किंवा मॉलमध्ये जातो. कपडे खरेदी केल्यानंतर ते व्यवस्थित आले आहेत की नाही हे तपासण्यासाठी ते आपण घालूनही पाहतो. कपडे ट्राय करण्यासाठी आपण सर्सास ट्रायल रुमचा वापर करतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
परंतु याआधी ट्रायल रुममध्ये छुपे कॅमेरे असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. ट्रायल रुममधील बल्ब, बोर्ड किंवा आरशामागे छुपा कॅमेरा ठेवून अनेकदा रेकॉर्डिंग केली जाते. या छुप्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुली, महिला तसेच पुरूषांचेही ड्रेस चेंज करतानाचे व्हिडीओ व्हायरल होण्याची शक्यता असते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
त्यामुळेच ट्रायल रुममध्ये कपडे ट्राय करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे.तुम्ही ट्रायल रुममध्ये कपडे घालून पाहात असाल तर अगोदर ट्रायल रुममध्ये कुठे छुपा कॅमेरा तर नाही ना? याची खात्री करा. तुम्हाला कुठे चमकदार आणि कॅमेरा लेन्ससारखे काही दिसले तर लगेच तेथील कर्मचाऱ्यांना सांगा. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा आहे की नाही? हे तपासण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या कॅमेरा डिटेक्टर अॅपचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला लपवून ठेवलेले कॅमेरे लगेच शोधता येतील. मोबाईल टॉर्चच्या मदतीने टाईल्स, आरसा हँगर अशा टिकाणी कॅमेरा लपवलेला नाही ना? याची खात्री करा. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
ट्रायल रुममध्ये तुम्हाला एखादी चमकदार वस्तू दिसली की लगेच सतर्क व्हा आणि व्यवस्थानाच्या निदर्शनास ती बाब आणून द्या. सोबतच तुम्हाला ट्रायल रुममध्ये काही आक्षेपार्ह बाब दिसली की लगेच तुम्ही तेथील व्यवस्थापनाकडे तक्रार करणे गरजेचे आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)