Best Friend : आयुष्यात हा मित्र सोबत असेल तर विनाश अटळ, वेळीच ओळखा अन् व्हा सावध!
काही मित्र तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत असतात. सुख, दु:खात आपल्या सोबत राहून आपल्याला पाठिंबा देत असतात. परंतु काही मित्र हे फारच स्वार्थी असतात. अशा स्वार्थी मित्रांपासून सावध राहायला हवे.

मित्र हे संकटकाळी मदतीला धावून येतात. एकदा का मैत्री झाली की ती आयुष्यभर पुरणारी असते. काही मित्र तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत असतात. सुख, दु:खात आपल्या सोबत राहून आपल्याला पाठिंबा देत असतात. परंतु काही मित्र हे फारच स्वार्थी असतात. अशा स्वार्थी मित्रांपासून सावध राहायला हवे.

काही मित्र हे स्वार्थी आहेत, त्यांच्यासोबत राहिल्यावर तुमचा तोटा होऊ शकतो, हे ओळखणे तसे कठीण आहे. परंतु काही विशेष बाबींकडे लक्ष देऊन तुम्ही असे स्वार्थी मित्र ओळखू शकता. एकदा का असे स्वार्थी, संकटात टाकणारे मित्र ओळखता आले की त्यांच्यापासून दूर राहायला हवे.

एखादा मित्र तुम्हाला काही गोष्टी अजिबात घरी सांगू नको, असे सांगत असेल तर समजा त्याच्या मनात काहीतरी विचित्र चालू आहे. असा मित्र तुमचा फायदा घेऊ शकतो. त्यामुळेच त्याच्यापासून दूर राहायला हवे. शाळा, ट्युशन किंवा अन्य ठिकाणी असे मित्र तुम्हाला संकटात टाकू शकतात.

तुम्हाला न आवडणारे काम तुमचा मित्र करायला लावत असेल तर त्याचा यात स्वार्थ आहे, असे ओळखावे. विशेष म्हणजे एखादे काम करण्यासाठी मित्र तुमच्यावर जबरदस्ती करत असेल तर त्याच्यापासून लवकरात लवकर लांब राहावे. अन्यथा तुम्ही खूपच मोठ्या संकटात सापडू शकता.

एखादा मित्र अभ्यास, शाळा, कॉलेजला बोअरिंग म्हणत असेल तर अशा मित्रापासून दूर राहावे. तो भविष्यात तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतो. हा मित्र स्वत: अभ्यास करून तुमचा मित्र तुम्हाला गाफील ठेवू शकतो. त्यामुळे असे मित्र तुमचा घात करू शकतात.