घरीच बनवा आजीच्या हातची साजूक तुपातली पुरणपोळी; बघताच तोंडाला सुुटेल पाणी
चणाडाळ, गूळ, वेलची आणि जायफळ यांचा सुगंध असलेली पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राच्या पारंपरिक जेवणाची खासियत. साजूक तुपाची धार देऊन आजीच्या हातची चव घरच्या घरी मिळवण्यासाठी जाणून घ्या ही सोपी रेसिपी.

साजूक तुपातली पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि सण- उत्सवाच्या जेवणाचा गोडवा आहे.मऊ,सुगंधी आणि गोड पुरणाने भरलेली आणि वरून साजूप तुपाची धार असलेली पुरणपोळी, आहाहा आलं की नाही तोंडात पाणी. चला चला लगेच बनवायलाच घेऊ.
साहित्य : 1 वाटी चणाडाळ, 1 वाटी गूळ, 2 ते 3 वेलची,अर्धा चमचा जायफळ पूड, केशराची पूड आणि काड्या, 1 चमचा साजूक तूप , कणकेसाठी 1 वाटी गव्हाचं पीठ किंवा मैदा, मीठ, 2 चमचे तेल, पाणी
चणाडाळ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या. डाळ खूप पातळ शिजवू नका. कारण पुरण बनवताना त्यातील पाणी जास्तीच पाणी काढाव लागतं.
डाळ शिजली कि निथळून घ्या. कढईत शिजलेली डाळ आणि गूळ घाला. मंद आचेवर हे मिश्रण सतत हलवत राहा. गूळ विरघळ्यानंतर मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागेल.
पुरणं घट्ट झालं की त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घाला. थोडं केशरही घालू शकता. 1 चमचा साजूक तूप घातल्याने पुरणाला छान सुगंध आणि मऊपणा येईल
पुरणं थंड होऊ द्या. त्यानंतर ते पेल्याने किंवा पूरणाच्या भांड्याने मऊ करा. पुरण अगदी मऊ आणि एकसारखं होऊ द्या
पोळीची कणीक मळा. पिठात चिमूटभर मीठ आणि तेल घालून मऊसर कणीक मळा. मळल्यावर थोडं तेल लावून थोडावेळ झाकून ठेवा.
कणकेच्या गोळ्यात पुरणाचा गोळा व्यवस्थित भरा कडा बंद करा. आता हलक्या हाताने पोळी लाटून घ्या. पोळी लाटताना जोर लावू नका नाहीतर पुरण बाहेर येईल.
तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर पुरणपोळी टाका. एका बाजूने हलके काळे डाग आले की पोळी पलटवा. दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतल्यावर त्यावर भरपूर साजूक तूप सोडा.
गरमागरम पुरणपोळी ताटात काढा आणि वरून पुन्हा साजूक तूप घाला. सोबत गरम दूध, कटाची आमटी किंवा तूप - साखर दिली तर जेवणाची रंगतच वाढते