AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 वर्षापासून मी ऐकतेय मंत्री होणार… सुप्रिया सुळेंचं मिश्किल विधान, मुख्यमंत्रीपदाची चर्चा फेटाळली

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा फेटाळताना सुप्रिया सुळे यांनी "गेले 12 वर्ष माझा शपथविधी होतोय" असे मिश्किल उत्तर दिले. संसदीय कामांवर लक्ष न देता केवळ राजकीय अफवांवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य करणंही त्यांनी टाळलं

12 वर्षापासून मी ऐकतेय मंत्री होणार... सुप्रिया सुळेंचं मिश्किल विधान, मुख्यमंत्रीपदाची चर्चा फेटाळली
supriya suleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 1:51 PM
Share

गेल्या काही वर्षापासून शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार हे एनडीएत सामील होतील आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील. बाकीचे नेते राज्य सांभाळतील आणि सुप्रिया सुळे दिल्ली सांभाळतील, अशी एक थिअरी गेल्या अनेक वर्षापासून मांडली जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. कालपासून राजकीय वर्तुळात ही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी 12 वर्षापासून ऐकतेय मी मंत्री होणार, असं मिश्किल विधान करत मुख्यमंत्रीपदाची चर्चा फेटाळून लावली आहे.

खासदार सुप्रिया सुळे या कराडमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांना तुम्ही मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गेली 12 वर्ष माझा शपथविधी होतोय. माझ्यावर अन्याय करू नका. गेले 12 वर्ष म्हणेज 2014 पासून मी मंत्री होतेय. त्यामुळे या कोणत्याच कथांमध्ये मला घेऊ नका, असं मिश्किल विधान सुप्रिया सुळे यांनी केलं.

दु:ख याचं वाटतं की…

संसदेत मी बारामतीचं प्रतिनिधीत्व करते. मी महाराष्ट्राची प्रतिनिधी म्हणून जाते. जेपीसीसह चार महत्त्वाच्या समित्यांवर मी काम करत आहे. मला या समित्यांबाबत कोणीच काही प्रश्न विचारत नाही, याचं मला दु:ख वाटतं. मला पॉलिसी मेकिंगबाबत कोणी विचारत नाही. मी ज्यासाठी निवडून गेले, त्याबाबत विचारलं जात नाही. त्यावर एखादा प्रश्न विचारला तर मला आनंद होईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

रामकृष्ण हरी, हातच जोडले

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी हातच जोडले. तुम्ही टीव्ही बघता ना? चॅनेलवर मागच्या आठवड्यात मी काय सांगितलं? या विषयावर रामकृष्ण हरी, असे म्हणत त्यावर त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

रोहित पवार यांची गुप्त बैठक?

रोहित पवार यांनी काल पक्षाची गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे, याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर त्यांनी हसून उत्तर दिलं. गुप्त म्हणजे काय? काल रोहित नागपूरला नव्हता. लोकेशन चेक करा. हे हस्यास्पद आहे. पक्षाची गुप्त बैठक हे इंटरेस्टिंग आहे. पहिल्यांदाच ऐकलं मी, असं विधान त्यांनी केलं.

चर्चा कशी सुरू झाली?

दरम्यान, एका इंग्रजी दैनिकाने काल सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असल्याची बातमी दिली होती. शरद पवार हे एनडीएसोबत जाण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात. त्यामुळे सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असं या वृत्तात म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांना भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकते तर पवारही मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात, असं या वृत्तात म्हटलं होतं. त्यामुळे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Follow Us
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...
राऊतांच्या आरोपांना शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊतांच्या आरोपांना संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला...
Amravati : 2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला कायदेशीर नोटीस
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर मुबई हायकोर्ट मध्ये सुनावणी...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर मुबई हायकोर्ट मध्ये सुनावणी
नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, दिपके नागपूरला रवाना
CJP Protest : नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, अभिजित दिपके नागपूरला रवाना
राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा...
Raj thackeray : राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा; निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राऊतांचा शिंदे...
Sanjay Raut : लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली, चर्चांना उधाण