Tilachi Chutney : रोजच्या जेवणाला द्या झणझणीत ट्विस्ट; कमी साहित्यात झटपट तयार होणारी सोपी ‘तिळाची चटणी’

भाजी चपाती किंवा भाकरी खाल्ली तरी काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. काहीतरी आणखी मिळालं असतं तर जेवायला आणखी मज्जा आली असती.असं राहून राहून वाटतं पण चटण्या बनवायचा कंटाळा सोला, ठेचा, वाटा हे सगळं कोण करेल? पण तिळाची चटणी सर्वात सोपी

| Updated on: Oct 31, 2026 | 9:38 PM
1 / 7
भाजी चपाती किंवा भाकरी खाल्ली तरी काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. काहीतरी आणखी मिळालं असतं तर जेवयाल आणखी मज्जा आली असती.असं राहून राहून वाटतं आणि ती राहिलेली गोष्ट म्हणजे चटणी, ताटाच्या छोट्या कोपऱ्यात असते पण तिच्या चवीमुळे जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं.

भाजी चपाती किंवा भाकरी खाल्ली तरी काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. काहीतरी आणखी मिळालं असतं तर जेवयाल आणखी मज्जा आली असती.असं राहून राहून वाटतं आणि ती राहिलेली गोष्ट म्हणजे चटणी, ताटाच्या छोट्या कोपऱ्यात असते पण तिच्या चवीमुळे जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं.

2 / 7

पण चटण्या बनवायचा कंटाळा सोला, ठेचा, वाटा हे सगळं कोण करेल? पण तिळाची चटणी सर्वात सोपी. एकदम म्हणजे एकदम सोपी.कमी कष्ट आणि कामही फाष्ट.. चला तर सोपी रेसिपी जाणून घेऊ.

3 / 7

साहित्य : पांढरे तीळ - 1 वाटी किंवा 1 कप, शेंगदाणे - 1/ 2 वाटी, सुके खोबरे किसलेले - 1/4 वाटी, लसूण पाकळ्या - 10 ते 12, जिरे - 1 छोटा चमचा, लाल तिखट - 1 ते 2 मोठे चमचे, मीठ

4 / 7

तीळ भाजणे : कढईमध्ये मंद आचेवर तीळ खमंग, खरपूस भाजून घ्या. तीळ जास्त भाजू नका नाहीतर ते जळतील आणि चटणीची चव कडू होईल. भाजून झाले की एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.

5 / 7

शेंगदाणे व खोबरे भाजणे: त्याच कढईत शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात किसलेले सुके खोबरे आणि जिरे घालून थोडे परतून घ्या.

6 / 7

मिक्सरमध्ये वाटणे: भाजलेले सर्व घटक (तीळ, शेंगदाणे, खोबरे, जिरे) एका ताटात काढून नीट थंड करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले सर्व साहित्य, लसूण पाकळ्या, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका.पाट्यावर वाटलंत तर एकदम उत्तम

7 / 7

चटणी तयार करणे: मिक्सरला फार बारीक पेस्ट न करता, थोडे जाडसर वाटून घ्या.तुमची खमंग तिळाची सुकी चटणी तयार आहे! ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती किंवा गरम भातासोबत खाऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us