Diwali 2025 : कसं कराल लक्ष्मीपूजन, कोणते लागतात साहित्य, जाणून घ्या सर्वकाही

दिवाळीच्या दिवसांमधला सर्वात महत्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन... यंदाच्या वर्षी लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर रोजी आहे आणि पूजनासाठी फक्त अडीच तासांचा शुभ मुहूर्त आहे. पण पूजा कशी करावी याबद्दल जाणून घ्या... काही मुद्द्यांमध्ये जाणून घ्या लक्ष्मीपूजन कसं कराल..

| Updated on: Oct 20, 2025 | 3:10 PM
1 / 5
पूजनापूर्वी घर स्वच्छ करून रांगोळी काढली जाते. मुख्य दरवाज्यावर तोरण (फुलांचे किंवा आंब्याच्या पानांचे) लावले जाते. लक्ष्मी व गणपती मूर्ती किंवा चित्र, अक्षता, कुंकू, हळद, हार-फुलं, सुपारी, अगरबत्ती, दीप, तूप/तेल, नैवेद्य, नाणे/रोख रक्कम.. असे साहित्य घ्या...

2 / 5
लक्ष्मी व गणपतीची मूर्ती पूर्वमुखी किंवा पश्चिममुखी ठेवावी. लक्ष्मीजीच्या उजव्या बाजूला गणपती ठेवावा, आणि समोर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून त्यावर मूर्ती ठेवाव्यात.

3 / 5
गंगाजल शिंपडून पूजा जागेची शुद्धी केली जाते. नंतर संकल्प केला जातो. कोणतीही पूजा गणेश पूजनाशिवाय पूर्ण होत नाही. प्रथम गणपतीला कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा केली जाते.

4 / 5
 देवीला फुले, सुवासिक फुले, हार, नैवेद्य अर्पण केला जातो. चांदी/सोनं/नवीन नोटा यांची पूजा केली जाते. पुस्तकं, हिशोबाची वही सुद्धा पूजली जातात.

5 / 5
 लक्ष्मी-गणपतीची आरती केली जाते. नंतर घरात दीप लावले जातात आणि फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. दिवाळीत क्ष्मीपूजनाचं फार महत्त्व आहे..