
आयएएस अधिकारी अतहर खान... अतहर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. ते वेगवेगळ्या पोस्ट करताना दिसतात. आताही त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

अतहर यांच्या पत्नी डॉ. मरहिन यांनी बकरी ईदनिमित्त काही खास फोटो शेअर केलेत. ईद मुबारक म्हणत मरहिन यांनी हे खास फोटो शेअर केलेत. या फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे.

अनेकांनी कमेंट करत या दोघांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात. तर तुम्ही दोघेही खूपच सुंदर आहात. तुमची जोडी छान आहे. तुम्ही दोघेही असेच एकत्र राहा, अशी कमेंट या दोघांच्या चाहत्याने केली आहे.

आयएएस अधिकारी अतहर खान आणि डॉ. मरहिन काझी यांचा 2022 ला विवाह झाला आहे. तेव्हापासूनच या दोघांच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत असते.

2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी अतहर खान हे सध्या जम्मू काश्मीरच्या कुलगामचे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट आणि डेप्युटी कमिशनर आहेत. तर मरहिन या पेशाने डॉक्टर आहेत. शिवाय त्या सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर देखील आहे.