मुंबईपासून जवळ असलेले हे धुक्याचे शहर, पावसाळ्यात हिरवेगार डोंगर अन् धबधब्याचे मनमोहक सौंदर्य

मुंबईपासून जवळ एक धुक्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ आहे. अगदी एका दिवसात पर्यटन करुन पुन्हा मुंबईला येता येते. दाट धुक्याने वेढलेल्या इगतपुरी या शहराला धुक्याचे शहर असे म्हटले जाते. कारण तिथे नेहमी धुक्याची चादर पसरलेली असते. अगदी तेथील फॉग पाईंटसुद्धा प्रसिद्ध आहे.

| Updated on: Jul 12, 2025 | 2:41 PM
1 / 5
मुंबईपासून जवळपास १२५ किलो मीटर अंतरावर असलेल्या इगतपुरी शहराला फॉग सिटी म्हणून ओळखले जाते. येथील घाटन देवी मंदिराजवळ फॉग पाईंटच आहे. या ठिकाणी वर्षांतून आठ महिने धूके असते. राज्यभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात.

2 / 5
इगतपुरीचे हवामान आल्हाददायक आहे. डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या शहराच्या जवळपास अनेक धबधबे आहेत. पावसाळ्यात त्याचे सौदर्यं पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. सर्व डोंगर हिरवेगार होऊन धबधबे जिवंत होतात.

3 / 5
इगतपुरीचा भावली धबधबा पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन आहे. येथील अद्भूत दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत असतात. शेकडो मीटर उंचीवरून हा धबधबा कोसळत असल्याने पर्यटकांना खुणावू लागला आहे.

4 / 5
मुंबईवरुन इगतपुरीला जाताना लागणारा कसारा घाट परिसर हा नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा अनुभव ठरतो. पावसाळ्यात या घाटातून अनेक धबधबे वाहताना दिसतात. सर्वत्र दाट वनराई आणि त्यात हिरवेगार डोंगर असा अनुभव पर्यटकांना येतो.

5 / 5
अशोका चित्रपटात दाखवण्यात आलेला अशोका धबधबाही इगतपुरीजवळ आहे. जव्हार फाटापासून सात किमी अंतरावर विहिगाव येथे हा धबधबा आहे. पूर्वी त्याला विहीगावचा धबधबा म्हटले जात होते. परंतु अशोका चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर तो अशोका धबधबा म्हणून प्रसिद्धीस आला.