
नागपूर : विदर्भात येणाऱ्या 4 ते 5 दिवस पावसाचा खंड असणार आहे. तशी माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितले आहे.

या काळात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता विदर्भातील शेतकऱ्यांना पावसाची वाट पहावी लागणार आहे.

आगामी 4 ते 5 दिवस पाऊन येणार नसल्यामुळे या काळात तापमानात थोडी वाढ होणार आहे. मात्र काही पट्ट्यात एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.


विदर्भात अजूनही मान्सूनच्या पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. 10 जूननंतर मान्सून सक्रीय होईल असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तविला आहे.