कॅप्टन स्मित मच्छार यांच्याबद्दल अत्यंत अभिमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतूक
भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार याने दुबई फ्लाय विमानात १८० हून अधिक प्रवाशांचे प्राण स्वत:च्या प्राणाची बाजी लावून वाचवले आणि इस्रायलवरील दुसरे 9/11 टाळले याबद्दल संपूर्ण जगातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार हा गुजरात येथील असून त्याने इस्रायलला जाणाऱ्या विमानात सह पायलटने अनेक जखमा करुनही विमानाचा ताबा सोडला नाही. त्यांनी दाखवलेल्या अचाट धाडसाने हजारो फूट उंचीवर असलेल्या या विमानातील १८० जणांचे प्राण वाचले आहेत.
2 - भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. यावेळी पायलट स्मित मछार यांच्या शौर्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले आहे.या प्रसंगी भाजप आमदार पराग शाह देखील उपस्थित होते.
3 -मुंबईचा सुपुत्र आणि खरा 'हिरो' कॅप्टन स्मित मच्छार यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत अभिमान वाटतो. त्यांनी अत्यंत असाधारण आणि विलक्षण पद्धतीने शेकडो लोकांचे प्राण वाचवल्याने त्यांच्याबद्दल आम्हाला अपार कौतूक वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
4 - पायलट स्मित मच्छार याला भयंकर दुखापत झालेली असतानाही, दुबई ते तेल अवीव या विमान प्रवासादरम्यान त्यांनी दाखवलेली प्रसंगावधानता आणि धैर्य खरोखरच अनुकरणीय आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
5 - त्या कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षितपणे मार्ग काढण्यासाठी एका टीमप्रमाणे तत्परतेने काम करणाऱ्या या विमानातील सर्व प्रवाशांनाही आपण सलाम करतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.स्मित हे लवकर बरे व्हावेत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी मी कामना करतो असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.