Imran Khan Farmhouse: भारत सोडण्याची वेळ आलेल्या इमरान खानचं कर्जतमध्ये सुंदर फार्महाऊस, पाहा आतुन कसे आहे?
Imran Khan Farmhouse: आमिर खानचा भाचा इमरान खानला 28 ऑक्टोबर पर्यंत देश सोडून जाण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. तो अमेरिकाचा नागरिक असून सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्याला ही नोटिस बजावण्यात आली आहे.

सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान हा चांगलाच चर्चेत आहे. भारतीय नागरिकत्व नसल्यामुळे त्याला देश सोडावा लागणार आहे. त्यामुळे इमरान हा चांगलाच चर्चेत आहे. त्याचे कर्जत येथे फार्महाऊस आहे. हे फार्महाऊस कसे आहे पाहा...
पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर इमरान खानने कर्जत इथे एक घर बांधले आहे. हे घर लग्झरी नसून अतिशय साधे आहे. घराच्या शेजारी हिरवळ पाहायला मिळत आहे.
इमरानचे हा फार्महाऊस त्याने स्वत: डिझाइन केले आहे. 2024मध्ये त्याने या घराची पहिली झलक दाखवली होती. हे घर बांधण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.
उंच डोंगरावर हे फार्महाऊस आहे. एक बेडरुम तेथे दिसत आहे. तसेच तेथे एक स्वयंपाक घर देखील आहे. उंचच्या उंच खिडक्या, समोर दिसणारी हिरवीगार झाडे, घरात येणारा सूर्यप्रकार अतिशय प्रसन्न करणारे वातावरण आहे.
२०२४ मध्ये इमरानने पोस्टमध्ये सांगितलं होतं की, त्याने वास्तुकलेचं कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही, तरीही त्याने हे घर स्वतः डिझाइन केलं आहे. तो स्वतः ३डी मॉडेलिंग शिकला आणि डिझाइन फायनल करण्यापूर्वी वर्षभर या जमिनीचा अभ्यास केला. "तर... गेल्या काही वर्षांत मी केलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे घर बांधणं. मी काही चित्रपटांमध्ये आर्किटेक्टची भूमिका केली आहे" असे तो म्हणाला.