Wedding Season : इन्स्टंट ग्लो हवा असेल तर वापरा हे ‘4’ पदार्थ

| Updated on: Dec 09, 2022 | 4:33 PM

1 / 5
लग्नाच्या हंगामात चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी अनेक उत्पादनांचा वापर केला जातो, मात्र त्यामुळे नुकसानही होऊ शकते. अशा उत्पादनांचा वापर करण्याऐवजी काही देशी उपाय करून झटपट चमक मिळू शकते. या पदार्थांचा वापर करून पहा.

2 / 5
लिंबू - हा एक असा पदार्थ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. तुम्ही चेहऱ्यासाठी लिंबाचा अनेक पद्धतीने वापर करू शकता. मात्र त्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा अथवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

3 / 5
मध आणि ओट्स - लग्नसमारंभ किंवा पार्टीसाठी तयार होताना इन्स्टंट ग्लो हवा असेल तर मध आणि ओट्स यांच्या स्क्रबचा वापर करावा. मधामध्ये दोन चमचे ओट्सची पावडस मिसळा व हा स्क्रब चेहऱ्यावर लावून स्क्रबिंग करावे. या उपायाने लगेच फरक पडेल.

4 / 5
साय आणि हळद - इन्स्टंट ग्लो साठी तुम्हाला नैसर्गिक क्रीम हवे असेल तर तुम्ही सायीचा वापर करू शकता. थोड्याशा सायीमध्ये हळद घालून नीट मिक्स करावी. हे मिश्रण चेहऱ्याला लावून 2 मिनिटे मसाज करावा. मात्र हे करताना  तुमच्या त्वचेचा पोत तपासून पहावा.

5 / 5
कॉफी - चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आणि लग्नात बेस्ट लूक मिळवण्यासाठी त्वचेसाठी कॉफीचा वापर करावा. एका वाटीत 1-2 चमचे कॉफी पावडर घेऊन त्यात गुलाबजल मिसळावे आणि चेहऱ्यावर स्क्रब करावे.