
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारताची सुरूवात एकदम खराब झाली पण हिटमॅनने फायनलमधील पराभवाचा राग काढल्याचं दिसून आलं.

रोहित शर्मा याने 41 बॉलमध्येव 92 धावांची जिगरबाज खेळी केली. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले. शतक हुकलं पण त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला. युवराज सिंह 12 बॉल, के. एल.राहुल 18 बॉल आणि रोहित शर्माने 19 बॉलमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

टी--20 क्रिकेटमध्ये 200 सिक्स मारणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या यादीमध्ये रोहित शर्मा 200, मार्टिन गुप्टिल 173, जॉस बटलर 137, ग्लेन मॅक्सवेल 132 सिक्सरसह चौथ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत भारताने त्यांना टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर ढकलले आहे. त्याचे सर्वात मोठे श्रेय हे भारतीय कर्णधार रोहित शर्माला जाते. कांगारूंविरुद्ध रोहित शर्माने ४२ बॉलमध्ये ९२ धावांची तुफानी खेळी केली होती. या स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावणाऱ्या रोहित शर्माकडून आजही चांगली सुरुवात करण्याची अपेक्षा असेल.