
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना सुरू व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. या सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला तर कसोटी मालिका खिशात घालणार आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये आता 2-1 ने आघाडी घेतली आहे. मात्र टीम मॅनेंजमेंटची गोची झाली आहे.

टीम इंडियाचा तीन मोठे खेळाडू विराट कोहली. जसप्रीत बुमराह आणि के. एल राहुल बाहेत आहेत. जसप्रीत बुमराह याच्या जागी वेगवान गोलंदाज खेळवतात की स्पिनर खेळवतात याबाबत काही निश्चित नाही.

स्पिनर खेळवण्याचा निर्णय घेतला तर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला संधी मिळू शकते. जर वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्यण घेतला तर मुकेश कुमार किंवा आकाश दीप यांना संधी मिळू शकते.

टीम मॅनेजमेंट याबाबत निर्णय घेईलच पण गेल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरत रजत पाटीदार याला खेळवावं लागणार आहे. चौथ्या सामन्यासाठी राहुल फिट झाला असता तर पाटीदार याला डच्चू मिळाला असता. मात्र आता टीम इंडियाला मधल्या फळीमध्ये नवीन बॅट्समन खेळवण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही.

चौथ्या सामन्यासाठी टीम इंडिया:- रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.