Gandiva Missile: भारताच्या महाविनाशक ‘गांडीव’ क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तान-चीन टेन्शनमध्ये, जाणून घ्या विशेष

Gandiva Missile: भारताने महाविनाशक 'गांडीव' क्षेपणास्त्राची जमीनीवरुन मारा करण्याची चाचणी यशस्वी केली आहे. आता हवेतून हवेत मार करण्याची तयारी सुरु केली आहे. डोळ्याची पापणी मिटताच शत्रूंचे टारगेट हे क्षेपणास्त्र नष्ट करणार आहे. भारताने या महाविनाशक क्षेपणास्त्राचे नाव महाभारतातील अर्जुन यांच्या 'गांडीव' धनुष्याच्या नावावर दिले आहे. सॉलिड फ्यूल डक्टेड रॅमजेट (SFDR) प्रपल्शन सिस्टमने हे क्षेपणास्त्र चालणार आहे.

| Updated on: Mar 06, 2025 | 1:43 PM
1 / 5
बियॉन्ड-व्हिजुअल-रेंज असणारे हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे असणार आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता पूर्णपणे बदलणार आहे. रिपोर्टनुसार 'गांडीव' च्या दोन जमीनी चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता त्याची हवाई चाचणी करण्यात येणार आहे. 'गांडीव'मध्ये चीनी स्टील्थ फायटर जेट्स हवेत नष्ट करण्याची क्षमता आहे.

2 / 5
Astra Mk-III म्हणजेच 'गांडीव' क्षेपणास्त्र अत्याधुनिक BVRAAM (Beyond Visual Range Air-to-Air Missile) आहे. म्हणजेच शत्रूचे क्षेपणास्त्र न पाहताच नष्ट करण्याची त्याची क्षमता आहे. त्यात असणारे सॉलिड फ्यूल डक्टेड रॅमजेटमुळे वेगाने लांबपर्यंत हे क्षेपणास्त्र जावू शकतो. सोशल मीडियावर आलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र उच्च उंचीवर 340 किमी आणि 8 किमी उंचीवर 190 किमीपर्यंत मारा करू शकते.

3 / 5
आयडीआरडब्ल्यूच्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतीय विमानांमध्ये 'गांडीव' बसवल्यानंतर युद्धाची परिस्थिती बदणार आहे. हे स्वदेशी क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाची क्षमता अनेक पटीने वाढवणार आहे. Astra Mklll क्षेपणास्त्राची पल्ला 140 ते 160 किलोमीटर असेल, तर Astra Mki ची पल्ला 80 ते 110 किलोमीटर असणार आहे.

4 / 5
गांडीव क्षेपणास्त्र उंचीवर चांगली कामगिरी करु शकतो. 8 किमी उंचीवरही ते 190 किमीपर्यंत धडकू शकते.  चीन आणि पाकिस्तानसारख्या भारताच्या शत्रूंकडे असलेल्या क्षेपणास्त्रांपेक्षा हा टप्पा खूप जास्त आहे.  भारताच्या राफेल लढाऊ विमानांमध्ये बसवलेल्या एमबीडीए उल्का क्षेपणास्त्रापेक्षाही त्याचा पल्ला जास्त आहे.

5 / 5
महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या धनुष्यावरून गांडीव हे नाव या क्षेपणास्त्र दिले आहे. त्याचे नावच त्याची ताकद आणि अचूकता दर्शवते. हे क्षेपणास्त्र केवळ शत्रूच्या लढाऊ विमानांना लक्ष्य करू शकत नाही तर AWACS हवाई इंधन भरणारे विमान आणि पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांसारख्या महत्त्वाच्या लक्ष्यांवरही मारा करू शकते. त्याच्या हल्ल्याचा 20 अंश कोन आणि ±10 किमी स्नॅप-अप/स्नॅप-डाउन क्षमता हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे शत्रूच्या विमानांच्या प्रत्येक हालचालीचा अंदाज घेऊनही लक्ष्यावर मार करू शकतो.