Weather Alert : ऐन दिवाळीत वारं फिरलं वारं, पावसाबाबत नको तोच इशारा, हवामान विभागाचा अलर्ट..

Weather Alert : राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार आहे. हवामान विभागाने अलर्ट जारी केला.

| Updated on: Nov 06, 2026 | 8:55 AM
1 / 5
महाराष्ट्रात हवामान बदल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस झाला. राज्यात सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर मुसळधार पाऊस कोसळताना दिसला. त्यातच आता पुन्हा हवामान विभागाने मोठा इशारा दिला. थंडीची चाहूलही जाणवत आहे.

महाराष्ट्रात हवामान बदल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस झाला. राज्यात सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर मुसळधार पाऊस कोसळताना दिसला. त्यातच आता पुन्हा हवामान विभागाने मोठा इशारा दिला. थंडीची चाहूलही जाणवत आहे.

2 / 5

आज 6 नोव्हेंबर 2026 रोजी कोकणासह विदर्भात इशारा देण्यात आला. उष्णता वाढताना दिसेल. रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

3 / 5

पुढील चार ते पाच दिवस हवामानात मोठे चढउतार बघायला मिळतील. जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये कोणत्याही प्रकारचा पावसाचा अलर्ट हा देण्यात आला नाहीये. कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्या तापमान 31 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

4 / 5

मराठवाड्यात तापमानात वाढ होईल. 33 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान जाण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भातही स्थिती सारखीच असणार आहे. विदर्भात तापमानात वाढ नोंदवली जाऊ शकते.

5 / 5

आज राज्यात कुठेही पावसाचा अंदाज देण्यात आला नाहीये. काही ठिकाणी हलका पाऊस येऊ शकतो, पण कुठेही पावसाचा अलर्ट नाही. उलट उष्णता वाढण्याचे दाट संकेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us