Photo | भारतीय संघांचे खेळाडू परिवारासह ऑस्ट्रेलियात दाखल, पाहा खास फोटो…
Follow us
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संपूर्ण भारतीय टीम ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे काही खेळाडू आपल्या परिवारासोबत दाखल झाले आहेत.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या काही खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत. अजिंक्य रहाणे, आर.अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि रविंद्र जाडेजा पत्नी आणि मुलांसह ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत.
भारतीय टीमचे सर्व खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये आहेत. तिथे त्यांना 14 दिवस क्वारन्टाईन राहावं लागणार आहेत. याचदरम्यान होणाऱ्या अभ्यास सत्राला भारतीय संघाचे खेळाडू हजेरी लावतील.
27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ 3 टी-ट्वेन्टी, 3 वनडे, आणि 4 टेस्ट मॅच खेळणार आहे.