40 वर्षे भीक मागून उभारली कोट्यावधींची संपत्ती, देशातील सर्वात श्रीमंत भिकारी मुंबईत

Indias Richest Beggar: मुंबईत एक असा भिकारी आहे ज्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्याने भीक मागून जवळपास ७.५ कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे. आता हा भिकारी कोण आहे? वाचा...

| Updated on: Jul 12, 2026 | 9:53 AM
1 / 6
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची चर्चा सुरु होती. हे भिकारी इतर इस्लामिक देशांमध्ये जाऊन मस्जिद बाहेर भीक मागत आणि लाखो रुपयांची कमाई करत असत. त्यांची कमाई ऐकून अनेकांना धक्का बसला होता. आता आपल्या देशातील एका भिकाऱ्याची चर्चा रंगली आहे. त्याची एकूण संपत्ती ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. कुटुंबियांनी वारंवार भीक मागणे बंद करण्यास सांगितले असूनही हा भिकारी भीक मागत आहे.

2 / 6

मुंबईच्या रस्त्यावर भीक मागणारे अनेक लोक दिसतात. काहींना खायला सुद्धा नसते, तर काही महिला आपल्या मुलाबाळांसाठी भीक मागताना दिसतात. पण याच भीक मागण्याच्या जगात एक अतिशय आश्चर्यकारक आणि खास कहाणी आहे.

3 / 6

मुंबईत भरत जैन नावाचा एक भिकारी आहे, ज्याने केवळ भीक मागून तब्बल ७.५ कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे. गेल्या ४० वर्षांपासून तो मुंबईच्या रस्त्यावर भीक मागत आहे. आज तो मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांपैकी एक बनला आहे.

4 / 6

भरत जैन सहसा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा आझाद मैदान परिसरात आढळतो. तो दिवसाला १० ते १२ तास भीक मागतो आणि त्याची दररोजची कमाई २००० ते २५०० रुपयांपर्यंत असते. यामुळे महिन्याला त्याची कमाई सुमारे ७५,००० रुपयांपर्यंत होते. ही रक्कम अनेक नोकरी करणाऱ्या लोकांच्या मासिक पगारापेक्षा जास्त आहे.

5 / 6

भीक मागून कमावलेल्या पैशातून त्याने मुंबईत १.४ कोटी रुपयांचे दोन फ्लॅट्स घेतले आहेत. शिवाय ठाण्यात त्याच्या मालकीची दोन दुकाने आहेत, ज्यातून त्याला दरमहा ३०,००० रुपयांचे भाडे मिळते. त्याच्या कुटुंबात पत्नी, दोन मुलगे, भाऊ आणि वडील यांचा समावेश आहे. त्याची मुले आता स्वतःचा स्टेशनरीचा व्यवसाय चालवत आहेत.

6 / 6

कुटुंबीय त्याला भीक मागणे सोडण्यास सांगतात, परंतु भरत जैन याला नकार देतो. तो म्हणतो, “मला भीक मागायला आवडते आणि मी ते सोडणार नाही. मी लोभी नाही, तर उदार आहे. मी मंदिरे आणि धर्मादाय संस्थांना दान देतो.” गेल्या अनेक वर्षांपासून भरत जैन यांची ही अनोखी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us