Indurikar Maharaj: मुली कधीच मुलावर प्रेम करत नाहीत, तर त्या… इंदुरीकर महाराजांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Indurikar Maharaj: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे सतत त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी मुलींबाबत असे काही विधान केले आहे की पुन्हा सर्वत्र चर्चा सुरु आहे.

| Updated on: Nov 17, 2026 | 11:22 AM
1 / 5
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे त्यांच्या किर्तनांमुळे अधूनमधून चर्चेत असतात. ते अनेकदा महिलांविषयी वादग्रस्त विधान करताना दिसतात. नुकताच इंदूरीकर महाराज यांनी एका किर्तनादरम्यान मुली कधीच मुलावर प्रेम करत नाहीत. त्या केवळ पैशांवर प्रेम करतात असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे त्यांच्या किर्तनांमुळे अधूनमधून चर्चेत असतात. ते अनेकदा महिलांविषयी वादग्रस्त विधान करताना दिसतात. नुकताच इंदूरीकर महाराज यांनी एका किर्तनादरम्यान मुली कधीच मुलावर प्रेम करत नाहीत. त्या केवळ पैशांवर प्रेम करतात असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

2 / 5

किर्तन करताना इंदूरीकर महाराज म्हणाले की, असे म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तिच्या मेंदूच्या तीन शिरा चोकअप आहेत. तेवढ्या काढून ये. पोरगी कधीच मुलावर प्रेम करत नाही. पोरगी पैशावर प्रेम करते. मुलगी कधीच प्रेम करत नाही. खरं आहे की खोटं आहे. तुम्हाला तिघांना आलेला अनुभव आहे. याला (एका तरुणाकडे इशारा करत) तर मागच्याच महिन्यात मुलीने धोका दिला आहे. खोटं बोलणार नाही.

3 / 5

किर्तन करताना इंदूरीकर महाराजांनी स्वत:ची प्रेमाची अशी एक व्याख्या सांगितली आहे. ते म्हणाले की, प्रेम वैगरे या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. इंदूरीकरची व्याख्या आहे लव्ह इज अ मनी आणि मनी इज अ लव्ह. मनी इज लाइफ आणि लाइफ इज अ मनी. त्यांच्या या विधनाची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

4 / 5

तसेच इंदुरीकर महाराजांनी मोबाईलबाबतही नागरिकांना सल्ला दिला आहे. मोबाईलमुळे लोक वेडी झाली आहेत. मोबाईल ही भारी वस्तू असून ते सतत उघडे ठेवू नका असेही इंदूरीकर महाराज म्हणाले.

5 / 5

सरकारने दिलेल्या पाच हजार रुपये आणि केंद्राच्या दोन हजार रुपयांमुळे यंदा सर्वांची दिवाळी मोठी झाली असे म्हणत इंदुरीकर महाराजांनी सरकारच्या मदतीचे कौतुक देखील केले. तसेच त्यांनी झेडपीच्या आणि नगरपालिकेच्या शाळा वाचल्या पाहिजेत नाहीतर सामान्य माणसाची मूल शिकू शकत नाहीत असेही म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us