Sania Mirza Luxury Home : सानिया मिर्झाच्या दुबईतील घरात रॉयल लूक, सलमान खानच्या गिफ्टनेही वेधलं लक्ष ; राजेशाही इंटीरियर पाहून व्हाल थक्क!
सानिया मिर्झाच्या दुबईतील आलिशान घराची सफर ! तिचा रॉयल ड्युप्लेक्स बंगला भव्य इंटेरियर, सोनेरी वॉलपेपर आणि अँटिक फर्निचरने सजलेला आहे. खाजगी पूल, मुलांसाठी खास खोली आणि सलमान खानने भेट दिलेलं चित्रं हे घराचे मुख्य आकर्षण आहे. तिच्या खेळाप्रमाणेच सानियाने तिचे घरही सौंदर्यपूर्णरीत्या सजवले आहे.

सानिया मिर्झा (Sania Mirza) ही टेनिसच्या विश्वातील मोठं , प्रसिद्ध नाव आहे. आपल्या शानदार खेळाने तिने जगभरात भारताचं नाव उचावलं आहे. आता सानिया तिच्या मुलासह दुबईमध्ये राहते.
अर्चना पूरण सिंहगने तिच्या व्लॉगमध्ये सानियाच्या घराची इनसाईड टूर दाखवली. राजेशाही इंटिरिअर, प्रायव्हेट पूल, मुलासाठी खास रूम यासह घरात अनेक आलिशान सुविधा आहेत.
सानियाच्या घराचं इंटिरिअर खूप रॉयल आहे. घरात सोनेरी, पांढरा,. ऑफ-व्हाईट , पीच आणि रॉयल ब्लू अशा रंगाचा वापर करण्यात आला आहे.
सानिया मिर्झाच्या घराच्या भिंतींवर गोल्डन वॉलपेपर लावण्यात आला आहे. खोलीच्या मध्यभागी मोठं झुंबर असून, त्यामुळे संपूर्ण खोलीला एखाद्या राजवाड्यासारखा रॉयल लुक मिळतो. अँटिक फर्निचर, सुंदर गालिचे आणि सोनेरी डिझाइन्समुळे घराची रॉयल थीम आणखी खुलून दिसते.
तिच्या घरात फॉर्मल आणि इनफॉर्मल असे दोन वेगवेगळे लिव्हिंग रूम आहेत. फॉर्मल लिव्हिंग रूमचा वापर पाहुण्यांसाठी केला जातो, तर इनफॉर्मल लिव्हिंग रूममध्ये कुटुंबातील सदस्य आरामात वेळ घालवतात. घराचं इंटीरियर मी स्वतः तयार केलं असं सानियाने सांगितलं. आपल्या आवडीनुसार तिने प्रत्येक खोलीचे रंग, फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू निवडल्या आहेत.
सानियाच्या म्हणण्यानुसार, घर सजवणं ही तिची लपलेली खुबी किंवा आवड म्हणता येईल. त्यामुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिची आवड आणि वैयक्तिक स्पर्श स्पष्टपणे दिसून येतो.
सानियाच्या घरातील सर्वात खास गोष्ट म्हणजे सलमान खानने तिला भेट म्हणून दिलेलं एक पेंटिंग. घरातील एका गेस्ट रूमच्या भिंतीवर नमाज अदा करणाऱ्या व्यक्तीची अनेक पेंटिंग्स लावण्यात आली आहेत. सानियाने सांगितले की, ही पेंटिंग्स सलमान खानने तिच्यासाठी स्वतः बनवली होती.
सानियाचा वॉक-इन वॉर्डरोब खूप मोठा आणि व्यवस्थित आहे. त्यामध्ये मेकअप प्रोडक्ट्स, शूज आणि बॅग्स ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे.
घरात सानियाने आपल्या पुरस्कार आणि उपलब्धी जतन करण्यासाठीही खास जागा तयार केली आहे. येथे तिचे अनेक पुरस्कार आणि आयुष्यातील खास आठवणींशी संबंधित वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.