AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता अंतरवाली सराटीत आंदोलन होणार नाही? ग्रामस्थ आणि सरपंचांनी उपोषणस्थळाचा मंडप हटवला; जरांगेंची पहिली प्रतिक्रिया समोर

Manoj Jarange Antarwali Sarati Protest tent: अंतरवाली सराटीतील मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळावरील मंडप हटवण्यात आला आहे. या निर्णयावर मनोज जरांगेंनी खंत व्यक्त केली आहे.

आता अंतरवाली सराटीत आंदोलन होणार नाही? ग्रामस्थ आणि सरपंचांनी उपोषणस्थळाचा मंडप हटवला; जरांगेंची पहिली प्रतिक्रिया समोर
| Updated on: Sep 26, 2026 | 5:13 PM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी १७ सप्टेंबर रोजी आपले उपोषण मागे घेतले होते. मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ९० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यांनी सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे गॅझेटियरबाबत कारवाई, कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रयत्नांचा विस्तार, तसेच EWS, SEBC आणि सारथी यांच्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली होती. यानंतर आता अंतरवाली सराटीतील त्यांच्या उपोषणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता त्यांचे आंदोलन अंतरवाली सराटीत होणार नाही. याबाबत ग्रामस्थ आणि सरपंचांनी मोठा निर्णय घेतला आहे. तर मनोज जरांगेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळावरील मंडप अखेर काढण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण करत असलेलं व्यासपीठ देखील काढण्यात आले आहे. सरपंच आणि ग्रामस्थांनी निर्णय घेऊन हा मंडप पाडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सध्या या ठिकाणी पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? मनोज जरांगे पाटील काय भूमिका स्पष्ट करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांचे लक्ष लागलं आहे.

यानंतर मनोज जरांगे यांनी शनिवारी इशारा दिला की, जर महायुती सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर कारवाई केली नाही, तर आंदोलनाचा नवीन टप्पा सुरू केला जाईल. तसेच पाटोदा येथून मिशन-३ सुरू करून त्यानंतर मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्यात येईल. अंतिम आणि निर्णायक आंदोलन अंतरवाली सराटी येथे होईल असे मी सांगितले होते, पण मंडप हटवल्याने तेथील आंदोलन आता पुढे ढकलण्यात आले आहे. अंतरवाली सराटी येथे आंदोलन थांबवल्याबद्दल मनोज जरांगेंनी खंत व्यक्त केली आहे. हे गाव आणि मराठा समाज यांच्यातील नाते कायम राहील, असे त्यांनी सांगितले.

तर आता मनोज जरांगेंनी मराठा समाजाच्या लोकांना दसरा रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, व्यापक दौरा व प्रचाराची तयारीही सुरू आहे. आम्ही शांत आहोत, पण लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरू. आता हे आंदोलन अधिक पद्धतशीरपणे चालवले जाईल. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) आपल्याविरुद्ध होणाऱ्या संभाव्य कारवाईबद्दल विचारले असता जरांगे म्हणाले की, ते चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. चौकशी पुढे चालू द्या. नोटीस कुठे आहे? चर्चा होऊ द्या. गरज पडल्यास आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. आम्ही तीन महिने शांत राहू, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

Follow Us
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर