
विराट कोहली उत्तम फलंदाज असण्याबरोबरच उत्तम फिल्डरही आहे. काल वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात हे दिसून आलं.

मोक्याच्या क्षणी त्याने दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतचा जबरदस्त झेल घेतला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ऋषभने कव्हर्सच्या दिशेने फटका खेळला होता.

चेंडू विराटच्या डोक्यावरुन जाणार होता. पण त्याने अप्रतिम अशी डाइव्ह मारुन एका हाताने झेल घेतला. खरोखरच ही कॅच लाजबाव होती.

विराटने हा झेल घेतल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलच. पण स्टेडियम मध्ये असलेल्या त्याच्या पत्नीच्या एक्स्प्रेशनही सर्व काही सांगून गेल्या. विराटचे सासू-सासरेही सामना पहायला स्टेडियममध्ये उपस्थित होते.

विराटने कॅच घेतल्यानंतर स्टँडमध्ये पत्नी अनुष्का शर्माच्या दिशेने पाहिलं. त्यावेळी तिला झालेला आनंद, तिची Reaction खूपच मनमोहक होती. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत.