Kranti Redkar : नावातच ‘रेड’कर, म्हणून… बायकोच्या आडनावाबद्दल असं काय बोलून गेले समीर वानखेडे!

Kranti Redkar : अभिनेत्री क्रांती रेडकर कायम सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचे पती आणि भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांनी बायकोच्या आडनावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांचं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे.

| Updated on: Nov 04, 2026 | 9:35 AM
1 / 5
अभिनेत्री क्रांती रेडकर हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या क्रांती ‘मैत्रेया’ सिनेमामुळे सर्वत्र चर्चेत आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर लॉन्चसोहळा पार पडला यावेळी क्रांतीचं कौतुक करत समीर  वानखेडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या क्रांती ‘मैत्रेया’ सिनेमामुळे सर्वत्र चर्चेत आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर लॉन्चसोहळा पार पडला यावेळी क्रांतीचं कौतुक करत समीर वानखेडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

2 / 5

बायकोचं कौतुक करत समीर वानखेडे म्हणाले, 'ड्रग्सच्या विरोधात आमचा मोठा लढा सुरु आहे. तर खूप लोकं मला विचारतात 'सर तुम्ही कशा प्रकारे संघर्ष करता?' तर मी म्हणतो, क्रांती आहे घरी क्रांती म्हणजे काय Revolution.. घरातच क्रांती आहे तर मी काय करणार..'

3 / 5

पुढे बायकोच्या आडनावाबद्दल समीर वानखेडे म्हणाले, 'नावामध्येच 'रेड'कर आहे, म्हणजे रेड कर... नावातच 'रेड'कर असेल तर बाहेर मी तेच करणार ना..' सध्या समीर वानखेडे यांचं हे वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे. व्हिडीओ अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

4 / 5

सांगायचं झालं तर, क्रांती रेडकर हिच्या घरावर देखील धाड टाकण्यात आली. यावर अभिनेत्री म्हणालेली, '17 तास आमच्या घरात रेड सुरु होती. आता या सर्व गोष्टींबद्दल मी धीट झाली आहे. मी अशी पटकन घाबरत वगैरे नाही. मानसिकरित्या मी खूप स्ट्राँग आहे..'

5 / 5

क्रांती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, मराठी सिनेविश्वात तिने स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री कायम मुलींबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us