PHOTO | आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी, कुठं सुरु होणार नवा नियम?

जपान सरकारनं त्यांच्या वार्षिक धोरणात याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांऐवजी चार दिवस काम करण्याची मुभा देण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 3:10 PM
1 / 5
जपानमध्ये आता आठवड्याचे कामाचे दिवस चार असणार आहेत. जपान सरकारनं त्यांच्या वार्षिक धोरणात याबाबत  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांऐवजी चार दिवस काम करण्याची मुभा देण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर राहण्याचा वेळ कमी होईल. कर्मचाऱ्यांच काम आणि त्यांचं दैनंदिन जीवन यामध्ये संतुलन साधण्याचा जपान सरकारचा प्रयत्न आहे.

2 / 5
कोरोना विषाणू महामारीच्या काळात जपानमधील कंपन्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये मोठा बदल केला आहे. जपानमधील सरकार आता कंपन्यांसोबत कामाचे तास कमी करणं आणि रिमोट वर्किंग कोरोनानंतर सुरु ठेवण्यासंदर्भात चर्चा करत आहे.

3 / 5
जपान सरकारच्या निर्णयानुसार आठवड्यातील कामाचे चार तास केल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत अधिकचा वेळ घालवता येईल. मुलांच्या संगोपणासोबतच वृद्ध माता पित्यांची देखभाल करता येईल. कौंटुंबिक कारणांमुळे त्यांना नोकरी सोडावी लागणार नाही, असं जपान सरकारला वाटते.

4 / 5
जपान सरकारला या निर्णयातून फायदा मिळण्याची शक्यता आहे. दर आठवड्याला मिळणाऱ्या अधिकच्या सुट्टीमुळं लोक घराबाहेर पडतील आणि खर्च करतील. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. चार दिवस काम तीन दिवस सुट्टी या निर्णयाचा देशातील युवा वर्गाला अधिक फायदा होईल, असं आंदाज आहे. तरुणांचं आपआपसात भेटणे, लग्न समारंभ अशा गोष्टींना अधिक  वेळ उपलब्ध होईल.  जपानमध्ये कमी होत असलेला जन्म दर, ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या, कमी होणारी लोकसंख्या या समस्या दूर करण्यासाठी मदत मिळेल, असं जपान सरकारला वाटतं.

5 / 5
जपान सरकार अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. जपान सरकारचा लोकांच्या राहणीमानात बदल घडवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी काम करण्याच्या पद्धती बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जपानमध्ये मायक्रोसॉफ्टनं 2019 मध्ये चार दिवस काम तीन दिवस सुट्टी अशा पद्धतीनं कामाला सुरुवात केली होती.

Follow Us