AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs SRH Live Streaming : राजस्थान आणि हैदराबादमध्ये कडवी झुंज, कोण करणार हल्लाबोल?

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Scorecard : राजस्थान रॉयल्स शनिवारी 25 एप्रिलला रियान पराग याच्या नेतृत्वात 19 व्या मोसमातील आपला सहावा विजय मिळवण्यासाठी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध भिडणार आहे.

RR vs SRH Live Streaming : राजस्थान आणि हैदराबादमध्ये कडवी झुंज, कोण करणार हल्लाबोल?
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad IPL 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 25, 2026 | 4:18 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शनिवारी 25 एप्रिल रोजी डबल हेडर खेळवण्यात येणार आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. राजस्थान आणि हैदराबाद या दोन्ही संघांचा हा या मोसातील सातवा सामना असणार आहे. राजस्थान या मोसमातील आतापर्यंत यशस्वी टीमपैकी आहे. त्यामुळे हैदराबाद राजस्थानला हल्ला बोल करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची मुद्दे जाणून घेऊयात.

युवा ऑलराउंडर रियान पराग राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करत आहे. तर पॅट कमिन्स राजस्थान विरूद्धच्या सामन्यातून नेतृत्वाची धुरा स्वीकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. पॅटला दुखापतीमुळे पहिल्या 6 सामन्यांना मुकावं लागलं. त्यामुळे पॅटच्या अनुपस्थितीत इशान किशन याने हैदराबादचं नेतृत्व केलं.

हैदराबादची कामगिरी

इशानच्या नेतृत्वात हैदराबादची अडखळत सुरुवात झाली. मात्र इशानने त्यानंतर हैदराबादची घडी बसवली. हैदराबादची मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली. त्यानंतर हैदराबादने दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं. हैदराबादला त्यानंतर सलग 2 सामने गमवावे लागले. त्यानंतर हैदराबादने कमाल केली. हैदराबादने सलग 3 सामने जिंकलेत.

अशाप्रकारे इशानने त्याच्या कॅप्टन्सीत हैदराबादला एकूण 4 सामन्यांत विजयी केलं. तर हैदराबादचा 3 सामन्यांत पराभव झाला. इशानने कर्णधार म्हणून आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यामुळे आता पॅट त्याच्या नेतृत्वात हैदराबादचा विजयरथ कायम ठेवण्यात यशस्वी ठरतो का याकडे ऑरेंज आर्मी चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

कॅप्टन रियान परागचे आकडे कसे?

तसेच रियान पराग याच्या नेतृत्वात राजस्थानने सलग 4 सामने जिंकत जबरदस्त कामगिरी केली. मात्र त्यानंतर राजस्थानची गाडी विजयी ट्रॅकवरुन घसरली. राजस्थानने सलग 2 सामने गमावले. त्यानंतर राजस्थानने पुन्हा विजय मिळवला. राजस्थानने अशाप्रकारे 7 पैकी 5 सामने आपल्या नावावर केलेत. तर 2 सामने गमावलेत. त्यामुळे आता शनिवारी होणाऱ्या सामन्यात कोणता संघ 2 गुणांची कमाई करणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

सामन्याबाबत महत्त्वाची माहिती

राजस्थान विरुद्ध हैदराबाद सामना सवाई मानसिंह स्टेडियम, राजस्थान इथे होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल. उभयसंघातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल