AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होतील चुटुकीसरशी

तुमच्या स्मार्टफोन आता अनेक गरजेच्या कामांचा सर्वात मोठा आधार बनला आहे. ओळख सिद्ध करणे असो, पैसे पाठवणे किंवा महत्वाचे दस्तावेज सांभाळणे असो सर्व काही मोबाईल ॲपद्वारे सहज होत आहे. सरकारने देखील असे ॲप लाँच केले आहेत. जे सर्वसामान्यांचे जीवन सोपे बनवत आहेत.

तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होतील चुटुकीसरशी
government apps
| Updated on: Apr 24, 2026 | 11:26 PM
Share

5 Government apps: भारत वेगाने डिजिटल बनत आहे. आता अनेक सरकारी सेवांसाठी मोठ्या लाईनत उभे रहाण्याची गरज नसते. तुमचा स्मार्टफोनचे अनेक गरजेच्या कामाचे माध्यम बनलेला आहे. ओळख द्यावयाची असो, पैसे पाठवणे, वा महत्वाची सरकारी दस्ताऐवज सांभाळण्याचे काम असो, सर्वकाही मोबाईल ॲपद्वारे सहज होत आहे. सरकारने देखील काही ॲप लाँच केले आहेत. जे सर्वसामान्याचे जीवन सहज आणि सोपे करत आहेत.

हेॲप न केवळ वेळ वाचवत आहे.तर ते सुरक्षा आणि सुविधा वाढवत आहेत. आजच्या काळात प्रत्येक भारतीयांच्या मोबाईलमध्ये काही सरकारी ॲप असणे खूपच गरजेचे आहे. हे ॲप तुम्हाला घर बसल्या अनेक काम करण्याची सुविधा देत आहेत. आणि सरकारी सेवांना तुमच्या हातात आणत आहेत.

Aadhaar App

Aadhaar ॲपद्वारे तुम्ही तुमचे ओळखपत्र मोबाईलमध्ये ठेवू शकता. आता फिजिकल कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही. यात क्युआर कोड स्कॅन, e-KYC आणि बायोमेट्रिक लॉक सारख्या सुविधा मिळतात. यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहाते आणि गरज असेल तेव्हा ही कागदपत्रे वापरता येतात.

DigiLocker

DigiLocker एक डिजिटल लॉकर सेवा ॲप आहे. यात तुम्ही तुमची इतर सरकारी कागदपत्रे ई-फाईलच्या रुपात सुरक्षित ठेवू शकता. यात ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड आणि एसएससी, एचएससी, पदवी अशा मार्कशिट्स डॉक्युमेंट स्वरुपात जतन करु शकता. हे दस्ताऐवज कायदेशीर रित्या मान्य होतात. आणि तुम्ही हे कुठे ही शेअर करुन तुमची अडलेली सरकारी कामे करु शकता.

UMANG

UMANG ॲप हे एकाच जागी अनेक सरकारी सेवा देते. यात तुम्ही बिल भरु शकता. आणि पीएफ बॅलन्स देखील पाहू शकता. गॅस बुक करु शकता आणि अन्य अनेक कामे करु शकता. हे ॲप अनेक भाषेत काम करते. त्यामुळे प्रत्येक राज्यातील लोक यास सहज वापरु शकतात.

mParivahan

mParivahan ॲपमध्ये तुम्ही ड्रायव्हींग लायसन्स आणि RC ची डिजिटल कॉपी ठेवू शकता. हा दस्ताऐवज ट्रॅफीक पोलिसांना मान्य असतो. यासाठी सोबत कागदपत्रे बाळगण्याची काही गरज नाही.

BHIM

BHIM ॲपद्वारे तुम्ही मोबाईल द्वारे तुरंत पैसे पाठवू किंवा मिळवू शकता. ही UPI वर आधारित आहे. आणि याचा वापर सहज करता येतो. हे सर्वॲप लोकांचे जीवनाला सोपे बनवत आहेत. यामुळे कागदाची गरज कमी होते. वेळ वाचतो आणि सरकारी कामे लवकर होतात. हे ऐप आज डिजिटल भारताचा एक महत्वाचा भाग बनले आहेत. जर तुमच्या मोबाईल फोनमध्ये हे ॲप नसतील तर तुम्ही अनेक सुविधांपासून वंचित राहू शकता. यामुळे या ॲपना लागलीच डाऊनलोड करणे गरजेचे आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...