Amitabh Bachchan: जया बच्चन यांची मालिका पाहून बिग बी खुर्चीवरुनच पडले, दिग्दर्शकाने केला खुलासा
jaya bachchan Tv Show: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी 90च्या दशकात एका मालिका आणली होती. या मालिकेचा एक एपिसोड पाहून अभिनेते अमिताभ बच्चन हे थेट खूर्चीवर खाली पडले होते. दिग्दर्शकाने स्वत: याबाबत सांगितले.

आजकाल अनेक मालिका येतात आणि जातात. त्या कोणत्या चॅनेलवर दिसतात हेही काहींनी माहिती नसते. कारण आजकाल त्यांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पण एक काळ असा होता जेव्हा फक्त दूरदर्शनवरच मालिका लागत असते. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची देखील एक मालिका होती. ती पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन हे थेट खूर्चीवरुन खाली पडले होते. मालिकेच्या दिग्दर्शकांनी हा किस्सा सांगितला होता. आता नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया...
ही मालिका 6 मे 1993 साली प्रदर्शित झाली होती. या मालिकेचे दिग्दर्शन आनंद महेंद्रू यांनी केले होते तर निर्मिती जया बच्चन केली होती. या मालिकेत दिग्गज दिग्दर्शक सुषमा सेठ, एन.के. शिवपुरी, नवीन निश्चोल, शेखर सुमन, फरीदा जलाल, भवन बलसावार, विशाल सेठ, नताशा सिंग, अमर उपाध्याय, देवेन भोजानी, उर्वशी ढोलकिया आणि सतीश शाह हे कलाकार दिसले होते.
मालिकेचे दिग्दर्शक आनंद महेंद्रू यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, 1992 साली जया बच्चन त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, 'मी यूकेमध्ये एक चॅनल सुरू करत आहे आणि त्यासाठी तुम्ही एक कॉमेडी शो बनवावा अशी माझी इच्छा आहे.' त्यानंतर आनंद यांनी एका संयुक्त कुटुंबावर आधारित कॉमेडी शो बनवण्याचा निर्णय घेतला.
आनंद महेंद्रू म्हणाले की, "मी त्याचा पायलट एपिसोड शूट करून जया यांना पाठवला होता. त्यानंतर मला अमिताभ बच्चन यांचा थेट फोन आला होता. ते म्हणाले की त्यांना तो पायलट एपिसोड इतका आवडला की तो पाहत असताना ते इतके हसले की खुर्चीवरून खाली पडले."
या मालिकेची कथा मुंबईतील आपल्या वडिलोपार्जित घरात एकत्र राहणाऱ्या दिवाण कुटुंबाच्या तीन पिढ्यांभोवती फिरणारी होती. या मालिकेत व्यवसायातील समस्या, पालकत्व आणि सासरच्या मंडळींसह संयुक्त कुटुंबातील अडचणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
हा शो त्यावेळी प्रचंड हिट ठरला होता. या शोचे जवळपास 50 भाग प्रसारित झाले होते. हा शो दररोज संध्याकाळी 6 वाजता प्रसारित व्हायचा आणि कामावरून परत आल्यावर संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हा शो बघायचे. या कार्यक्रमाचे जवळपास 13 भाग लंडनमध्ये चित्रित करण्यात आले होते. या शोचे नाव आहे 'देख भाई देख.'