Jio : Jio चा 3 इन 1 प्लॅन; एकाच प्लॅनमध्ये 3 डिव्हाईसना करता येणार रिचार्ज; जाणून घ्या कशी मिळवायची ऑफर
Jio ने ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे. ग्राहकांना प्रत्येक डिव्हाईससाठी वेगवेगळे रिचार्ज करण्याची गरज नाही. फक्त एकाच रिचार्जमध्ये ग्राहकांना 3 डिव्हाईसना रिचार्ज करणे शक्य होणार आहे. ही ऑफर कशी मिळवायची जाणून घ्या

घरात Wi - Fi वेगळं, टिव्हीसाठी वेगळं कनेक्शन आणि चित्रपट पाहण्यासाठी OTT अॅप्सचं स्वतंत्र सबस्क्रिप्शन....या सगळ्यांचा खर्च सांभाळताना अनेकदा बजेट बिघडंत. पण आता या तिन्ही सेवांसाठी वेगवेगळे प्लॅन घेण्याऐवजी एकाच पॅकमध्ये इंटरनेट, टिव्ही आणि ओटीटीचा लाभ घेण्याचा पर्याय जिओकडे आहे. रिलायन्स जिओच्या जिओहोम पॅकमध्ये ग्राहकांना आपल्या गरजेनुसार टिव्ही, वाय -फाय किंवा तिन्ही सेवा एकत्र निवडता येतात. या पॅकची सुरूवातीची प्रभावी किंमत महिन्याला 400 रूपये आहे.
टिव्ही पाहण्यासाठी 400 रूपयांचा पर्याय : ज्यांना मुख्यत: टिव्ही पाहायचा आहे. त्यांच्यासाठी जिओचा टिव्ही- ओन्ली पॅक उपलब्ध आहे. 5 महिन्यांसाठी या पॅकची किंमत 2,000 रूपये असून त्याचा महिन्याचा सरासरी खर्च 400 रूपये होतो. यात 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल, 200 हून अधिक HD CHANNEL आणि 15 हून अधिक प्रादेशिक भाषांतील चॅनेलचा समावेश आहे. याशिवाय 12 हून अधिक OTT APPS चा लाभही मिळतो.
फक्त WI-FI हवा असेल तर ? : ज्यांनी टिव्ही किंवा OTT INTERNET ची जास्त गरज आहे. त्यांच्यासाठी WI-FI चे स्वतंत्र पॅक आहे. 30 MBBS SPEED चा पाच महिन्यांचा पॅक 2,200 रूपयांना उपलब्ध आहे . म्हणजेच महिन्याला सरासरी 440 रूपये खर्च येतो. तर 100 MBPS SPEED 5 महिन्यांचा पॅक 3,000 रूपयांचा असून त्याचा महिन्याचा सरासरी खर्च 600 रूपये आहे.
INTERNET, TV आणि OTT एकाच पॅकमध्ये : Jio च्या 3 in -1 पॅकमध्ये WI-FI, LIVE TV, OTT APPS एकत्रित लाभ मिळतो. 30 MBPS SPEED च्या पॅकची किंमत 2,222 रूपये असून त्याची वैधता 4 महिन्याची आहे.त्यामुळे महिन्याची सरासरी खर्च सुमारे 555 रूपये होतो. या पॅकमध्ये 1,000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल आणि 12 OTT APPS चा लाभ मिळतो.
तर 100 MBPS SPEED चा दुसरा पर्याय 2,122 रूपयांना उपलब्ध आहे.या पॅकमध्ये 3 महिन्यांची वैधता मिळत असून महिन्याचा सरासरी खर्च फक्त ७०७ रूपये होतो. यातही इंटरनेट, टिव्ही चॅनेल आणि ओटीटी अॅप्सचा समावेश आहे. नवीन ग्राहकांना पात्रतेनुसार मोफत घरपोच INSTALLATION आणि देखभाल सेवेचाही लाभ मिळू शकतो. रिचार्ज करण्यापूर्वी अटी तपासून घ्या.