बेरोजगार लोकांसाठी रेल्वेत काम करण्याची मोठी संधी, फक्त बसून काम, पगारासह मिळणार कमिशन, फक्त…

रेल्वेकडून बेरोजगार नागरिकांसाठी मोठी संधी. या संधीचा लाभ दिव्यांग व्यक्तींसाठीच मिळणार आहे. फक्त एक अट असणार आहे.

| Updated on: Mar 21, 2026 | 11:43 AM
1 / 5
भारतीय रेल्वेने दिव्यांग नागरिकांसाठी रोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत झाशी मंडळात ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन चालवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींची भरती करण्यात येत आहे.

2 / 5
या योजनेअंतर्गत झाशी मंडळातील 12 रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या 22 एटीव्हीएम मशीनच्या ऑपरेशनसाठी तब्बल 65 सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी विशेषतः दिव्यांग व्यक्तींनाच अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

3 / 5
विशेष म्हणजे, लोकोमोटर डिसएबिलिटी ग्रस्त उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. या भरतीसाठी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी, त्यांच्या दिव्यांग कुटुंबीयांसह सामान्य दिव्यांग नागरिकही अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांचे काम प्रवाशांना एटीव्हीएम मशीनद्वारे तिकीट काढण्यासाठी मदत करणे असेल.

4 / 5
प्रत्येक तिकीटावर त्यांना ठराविक कमिशन मिळणार असून त्यामुळे त्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. ही यंत्रणा झाशी मंडळातील वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ग्वालियर, मुरैना, बांदा, चित्रकूट धाम कर्वी, महोबा, ललितपुर, डबरा, दतिया, उरई, खजुराहो आणि हरपालपुर या स्थानकांवर उपलब्ध आहे.

5 / 5
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत जवळच्या बुकिंग ऑफिसमधून अर्ज फॉर्म घ्यावा. तसेच अर्ज North Central Railway च्या अधिकृत वेबसाइटवरूनही डाउनलोड करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे.

Follow Us