Kajol : माझ्या आत्म्याची सर्वात मोठी खासियत…, काजोलच्या ‘या’ पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष
Kajol : अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल हिच्या सौंदर्याच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण आता तिच्या लूकपेक्षा तिने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्री काजोल झगमगत्या विश्वात पूर्वीप्रामाणे सक्रिय नसली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. काळ्या साडीत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेत. काळ्या रंगाच्या साडीत काजोल हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिची चर्चा रंगली आहे.
काळ्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट करत काजोल म्हणते, माझ्या आत्म्याची सर्वात मोठी खासियत ही आहे की, काळा रंग प्रत्येक गोष्टीसोबत शोभून दिसतो., सध्या सर्वत्र काजोलच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.
साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
सोशल मीडियावर काजोल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.