
कार्तिकी एकादशीनिमित्त विठुराया आणि रखुमाईची महापूजा संपन्न झाली.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली.

यंदा नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याचा मान मिळाला. फडणवीसांसोबत बबन घुगे आणि सौ. वत्सला घुगे यांनी विठ्ठलाची मनोभावे पूजा केली.

आज पुन्हा एकदा सपत्नीक शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य प्राप्त झालं. विठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहू देत, सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाचरणी केली.

आज शेतीवर संकट आहे. अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. महाराष्ट्रात मराठा, धनगर यसह आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत . विठुरायानी या सर्वांच्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद विठ्ठलाने द्यावी, असं देवेंद्र फडणवीस, यावेळी म्हणाले.

विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर आणि संकुल जतन तसंच दुरुस्ती आणि संवर्धन प्रकल्प कामाचा भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडला. देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या हस्ते हे भूमीपूजन पार पडलं.