AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Siya Goyal Lohgad Murder Case : केतनच्या हत्येआधी सियाने गुगलवर काय-काय शोधलं? पोलीस तपास, कोठडी, सोनम रघुवंशीबाबत धक्कादायक खुलासा

केतन अग्रवालच्या हादरवणाऱ्या हत्याकांडाचा तपास अजून सुरू असून, अजूनही नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया हिने फुलप्रूफ प्लानिंगर करूनचा हा कट रचल्याचं समोर आलं आहे. मात्र हा प्लान अमलात आणण्यापूर्वी तिने काही गोष्टींची माहिती मिळवली होती, असं उघड झालं आहे.

| Updated on: Jul 07, 2026 | 3:08 PM
Share
18 जून रोजी केतन अग्रवाल या 25-26 वर्षांच्या तरूणाची लोहगडावरून खाली दरीत ढकलून हत्या करण्यात आली. त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनीच हे हादरवणारं कृत्य केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांनी खुनाची कबुलीही दिली आहे. सध्या ते दोघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

1 / 5
पोलीस कोठडीत असताना त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अद्यापही या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरू असून त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतनला मारण्याच्या आधी सियाने बऱ्याच गोष्ठी धुंडाळून, समाज माध्यमं अर्थात सोशल मीडियावरून बरंच काही शोधून प्लान आखला होता, असं आता उघड झालंय.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, सिया गोयलने केतन अग्रवालच्या हत्येआधी पोलीसांच्या तपासाबाबत आणि न्यायालयातील प्रक्रियेबाबत काही माहिती मिळवली होती, असं पोलीसांनी तिच्याकडे केलेल्या तपासातून समोर आलं आहे.

3 / 5
एवढंच नव्हे तर महिला आरोपींना पोलिस कशी वागणूक देतात, पोलीस कोठडीत महिला आरोपींना मारहाण होते का , तपासात कोणते प्रश्न विचारले जातात आणि सोनम रघुवंशी हिला जामीन कसा मिळाला,  अशा स्वरुपाची माहिती सिया गोयलने वेगवेगळ्या माध्यमांतून मिळविण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे.

4 / 5
दरम्यान मध्यंतरी पोलिसांनी सिया गोयलला तिच्या घरी नेलं, तेव्हा तिचा दुसरा मोबाईल जप्त केला. मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या आधारे पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली होती. एवढंच नव्हे तर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केलं, असा पोलिसांचा अंदाज आहे. हे लग्न कुटुंबियांपासून लपून केलं होतं, असा दावा करण्यात येत असला तरी कुटुंबातील सदस्यांना त्याची कुणकुण असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

5 / 5
Follow Us