
तुम्ही आतापर्यंत सेलिब्रेशनच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या असतील. काहीवेळा खेळाडू मैदानात घसरतात. डान्स करतात.

पण एका महिला बॉक्सरने सेलिब्रेशनच्या सगळ्या मर्यादाच ओलांडल्या. विजयानंतर तिला स्वत:वरती ताबा ठेवता आला नाही. तिने थेट टी-शर्टच काढलं.

ताय एमिरी या किक बॉक्सरने अशा पद्धतीच विचित्र सेलिब्रेशन केलं. बेयर नकल फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने आपला डेब्यु केला. 35 वर्षाच्या तायने अपरकट मारुन विरोधी खेळाडूला नॉकआऊट केलं.

त्यानंतर ताय एमिरी रिंगवरती चढली. त्यानंतर जे घडलं, ते पाहून सर्व थक्क झाले. ताय एमिरीने आपलं टी शर्ट वर केलं. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

एमिरीला मागच्या वर्षभरापासून बेयर नकल फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये खेळायचं होतं. पण तिला स्पॉन्सर मिळत नव्हते.

त्यानंतर ताय एमिरीला केंड्रा लस्ट या पॉनस्टारने स्पॉन्सर केलं. रिंगमधील तायच्या कृतीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

ताय एमिरीला विजयानंतर केंड्र लस्टने शुभेच्छा दिल्या. 'ताय एमिरी विजयासाठी शुभेच्छा. बीकेएफसीमध्ये तुझा विजय कमाल आहे'

"पहिल्या राऊंडमध्ये नॉकआऊट. तुला स्पॉन्सरशिप देणं फायद्याच ठरलं. विजयानंतर तुझं सेलिब्रेशनही बेस्ट होतं" असं केंड्र लस्टने म्हटलं आहे.

"ताय एमिरीने सुद्धा केंड्रा लस्टचे आभार मानलेत. तुमच्यामुळे मला ट्रेनिंग शक्य झाली. तुमच्यामुळे माझ्या डोक्यावर छप्पर आहे. मी नेहमीच तुमच्या आर्मीचा भाग राहीन" असं ताय एमिरीने म्हटलं आहे.

ताय एमिरीची कृती धक्कादायक असली, तरी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक हॉट, बोल्ड फोटो पोस्ट केलेत.