तू एक सावत्र आई… सैफचा मुलगा इब्राहिम खानचं बोलणं ऐकून करिनाही शॉक, रिॲक्शनची चर्चा
Saif Ali Khan And Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर कॉफी विथ करन या शोमध्ये हजेरी लावलेली.

करण जोहरच्या कॉफी विथ करण या रिएलिटी शोचा हा शेवटचा सीझन असून यात करीना कपूर आणि सैफ अली खान या कपलने हजेरी लावली.
१६ वर्षांनंतर या कपलने पुन्हा एकदा याशोमध्ये हजेरी लावली. याशोमधील काही मजेशीर क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कपलला अभिनेत्री सारा आली खान आणि अभिनेता इब्राहिम अली यांनी एक सरप्राईज दिलं.
या बहिण भावांनी वडिल सैफ अली खान आणि करीना कपूरसाठी एक व्हिडिओ मॅसेज शूट केला. या व्हिडिओमध्ये सारा म्हणाली, "हॅलो फादर आणि करिना, तुमचा कॅफी विथ करण हा एपिसोड खूप छान जात असेलच."
अब्बा तुम्ही स्वॅग आणि कुलनेसमध्ये उत्तम आहातच. करिना कपूर आणि करण जोहर यांचे कॉम्बिनेशन म्हणजे बालपण असणार आहे. तिने साकारलेली पू ही भूमिका आजही तितकीच खूप आवडते."
तर इब्राहिम म्हणतो की, "अब्बा तुम्ही माझे रोल मॉडेल आहे, हिरो आहात. फक्त अभिनेते म्हणून नाही तर तुम्ही ज्या गोष्टींतून गेला आहात त्यामुळे. हार्ट अटॅक, अंगठ्याची दुखापत, चाकू हल्ला चांगल्या पद्धतीने निभावलं आहे म्हणूनच तुम्ही माझे हिरो आहात. "
बेबो मला तुला हे सांगायचंय की तू कुलेस्ट सावत्र आई आहे, आमच्यासाठी तू कायमच पाठीशी उभी राहिली आहेस. तुला खूप सारं प्रेम, "असं इब्राहिमने बोलून दाखवले आहे.